घरताज्या घडामोडीपालकांनो सावधान! मुलांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग

पालकांनो सावधान! मुलांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग

Subscribe

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचेकारण म्हणजे जानेवारी, एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. तसेच, सध्या राज्यात साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे.

दिल्लीच्या मधुकर रेनबो चिल्ड्रन रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वर्मा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, “सध्या कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये पुन्हा दिसून येत आहे. माझ्याकडे मोठ्या संख्येने असे रुग्ण आहेत. ज्या रुग्णांना याआधी आणि आता पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच

- Advertisement -

जानेवारी किंवा एप्रिलमध्ये ज्या मुलांना संसर्ग झाला होता ते पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. जर हा कोरोनाचा वेगळा प्रकार असेल तर तो लसीपासून संरक्षण करू शकणार नाही. कदाचित यामुळेच मुलांना दुसऱ्यांदा संसर्ग होत आहे”, असे सांगितले.

याशिवाय, “कोरोनाचा प्रादुर्भाव असून मुलांना साथीच्या आजारांचा संसर्गही होत आहे. शालेय व लहान मुलांनाही व्हायरल ताप आणि डेंग्यूचे लक्षण आढळून येत आहेत. नुकतेच स्वाइन फ्लूचे रुग्णही आढळून आले. दरम्यान, लहान मुलांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यावर घरी योग्य उपचार केले जाऊ शकतात. परंतु, नागरिकांमध्ये कोरोनाची गंभीर प्रकरणे अधिक सामान्य आहेत”, असेही डॉ. वर्मा यांनी म्हटले.

- Advertisement -

ताप, दुखणे आणि पुरळ येणे

“मुलांमध्ये ताप, घसा खवखवणे आणि पुरळ येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. काहींना उलट्या आणि जुलाबाचीही लक्षणे दिसतात”, असे डॉ. वर्मा यांनी म्हटले. तसेच, “कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण केल्याने रोगाची तीव्रता रोखण्यात मदत होते. संरक्षणासाठी, आपण हॉस्पिटल किंवा आयसीयूमध्ये न जाता मास्क घालणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे”, असेही डॉक्टर वर्मा यांनी म्हटले.


हेही वाचा – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट, कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -