घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत मागील २४ तासांत १,५६७ नवे कोरोनाचे रुग्ण; ९७...

Corona Live Update: मुंबईत मागील २४ तासांत १,५६७ नवे कोरोनाचे रुग्ण; ९७ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत मागील २४ तासांत कोरोनाचे १ हजार ५६७ नवे रुग्ण आढळले असून एकूण मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ हजार ४४५वर पोहोचला आहे. तसंच मागील २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतल मृतांचा आकडा १ हजार ८५५ झाला आहे. तसेच ७५१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा २३ हजार ६९३ झाला आहे.


राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडा जसा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसाच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे १४९ मृत्यू झाला असून ३ हजार २५४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९४ हजार ४१ वर पोहोचला असून मृतांचा आकडा ३ हजार ४३८ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ८७९ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४४ हजार ५१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -


गोव्यात आज कोरोनाचे २८ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३८७वर पोहोचला आहे. यामध्ये ३२० अॅक्टिव्ह रुग्ण असून ६७ जण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -


देशात मागील २४ तासांत ५ हजार ९९१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३५ २०५ झाली आहे. तर एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार ६३२ आहे. पहिल्यांदाच बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ओलांडली आहे. आता रिकव्हर होणाच्या रेट ४८.८८ टक्के आहे.


गोव्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३५९ असून २९२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच ६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी १०८ रुग्ण राज्याबाहेरील आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.


कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूवर लस बनवण्यासाठी सर्व देशातील वैज्ञानिक विविध संशोधन करत आहेत. यामध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी इत्यादींसह भारताचाही समावेश आहे. या लसीच्या यशाबद्दल भारताकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. लस बनवण्याच्या संदर्भात होणाऱ्या चाचणी दरम्यान भारतात त्याच्या उत्पादनाची तयारी सुरू झाली आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) च्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना विषाणूच्या लसीचे उत्पादन करणे तसेच पुरवठा करण्याची तयारी करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


‘या’ राज्यात करोना व्हायरसमुळे गेला पहिला बळी

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत होत आहे. मात्र, असे एक राज्य आहे. त्या राज्यात पहिल्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्रिपुरामध्ये मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे आगरतला येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने या व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. करोनामुळे गेलेला हा त्रिपुरामधील पहिला बळी ठरला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईतील १ हजार ९०८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये ९०५ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर यातील ८२ पीएसआरएफच्या जवानांचा समावेश आहे.


कोरोनाचे रुग्ण वाढल्याने राजस्थान सरकारने राज्याच्या सीमा केल्या सील. फक्त पास असणाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे.


महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकरता दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या चार दिवसांत महाराष्ट्र पोलीस दलात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तर पोलीस प्रशासन दलातील याआधी कोरोनाबाधित झालेल्या २ हजार ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत ३४ जणांचा या कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

No new #COVID19 case reported in Maharashtra Police in the last 48 hours. Total coronavirus cases in the force stand at 2,562, death toll at 34: Maharashtra Police pic.twitter.com/rdTccgDFx3

— ANI (@ANI) June 10, 2020


औरंगाबादमध्ये नव्या ११४ रुग्णांची वाढ

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत असून आज औरंगाबादमध्ये ११४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार २६४ झाली आहे. तर यापैकी १ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. तर ११६ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता ८६५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आज, बुधावारी प्रशासनाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


जगभरातील कोरोनाबोधितांचा आकडा ७३ लाखांच्या पार

चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना विषाणूचा कहर अद्याप सुरु आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ७३ लाख २३ हजार ७६१ वर पोहोचला आहे. तर ४ लाख १३ हजार ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३६ लाख ३ हजार ८९३ रुग्ण बरे झाले आहेत. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आहे. (सविस्तर वाचा)


देशभरात २४ तासांत ९ हजार ९८५ नवे रुग्ण

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ७६ हजार ५८३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ३३ हजार ६३२ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ३५ हजार २०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार ७४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात २ हजार २५९ नवे कोरोना रुग्ण मंगळवारी वाढले. तर एका दिवसात राज्यात १२० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ हजाक ६६३ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ३ हजार २८९ जणांचा बळी

तर राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९० हजार ७८७ इतकी झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ३ हजार २८९ जणांचा बळी गेला आहे.


या शहरात सर्वात अधिक रुग्ण

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत आज १ हजार १५ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांनी संख्या ५१ हजार १०० वर गेली आहे. त्यापैकी २२ हजार ९४३ रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईत १ हजार ७६० जण दगावले आहेत. मुंबईत सध्या २६ हजार ३९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -