घरCORONA UPDATECorona Live Update: आज अंबरनाथमध्ये ८२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या...

Corona Live Update: आज अंबरनाथमध्ये ८२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या ५४१!

Subscribe
अंबरनाथ शहरात आज ८२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतच्या आढळलेल्या संख्येत ही संख्या सर्वाधिक आहे, एकूण रुग्णसंख्या ५४१ पर्यंत पोहोचली असून मृतांची संख्या १८ आहे. आज आढळलेल्या रुग्णांपैकी ५ रुग्ण पूर्व भागातील असून ७७ रुग्ण पश्चिम भागातील आहेत. अद्यापही शहरात कोविड रुग्णालयाचे काम पूर्ण झालेले नसून उपजिल्हा दर्जाच्या छाया रुग्णालय देखील वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी शहराचा दौरा करून पाहणी केली आहे. शहरातील चिंताजनक स्थितीचा अहवाल राज्य शासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्याकडे प्राप्त झाला आहे. मात्र त्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे .

भिवंडीत गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ४३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात १९ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात आणि शहरात एकूण ६२ नवे रुग्ण आढळले आहेत. शहरात रोज कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णांना उपचार करण्यात देखील मनपा प्रशासन हतबल ठरले असल्याने शहरात कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू हिट असल्याचा आरोप दक्ष नागरिक करीत आहेत. आतापर्यंत शहरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मनपाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.

 दरम्यान भिवंडी शहरात आतापर्यंत ३९६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १५४ रुग्ण बरे झाले आहेत. तर २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून २२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत २०९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ९२ रुग्ण बरे झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून ११३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान गुरुवारी आढळलेल्या ६२ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर आणि ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ६०५ वर पोहचला असून त्यापैकी २४६ रुग्ण बरे झाले आहेत तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

मागील २४ तासांत मुंबईत १ हजार ५४० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण ५३ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून मृतांची संख्या १ हजार ९५२ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ५१६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २७ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

राज्यात कोरोनाचे आज सर्वाधिक ३ हजार ६०७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ झाला असून मृतांचा आकडा ३ हजार ५९०वर पोहोचला आहे. तसेच राज्यात आज १ हजार ५६१ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४६ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisement -

कोरोनामुक्त रुग्ण शहराची घोषणा करणाऱ्या अंबरनाथ पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून मंगळवारी जाहीर केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीतील तीन रुग्ण बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या तीन रुग्णाकडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असून हा वाढता कोरोना कहर याबाबत नगरपालिका अधिकारी आणि नोडल अधिकारी एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचे समोर आले आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनामुक्त अंबरनाथ घोषणा करणारे पालिका प्रशासन चक्क तोंडघशी पडले असून शहरातील आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाचा ताळमेळ बिघडत चाल्याने कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराची ‘छाया ‘दुरावस्थेत वेळेवर उपचार अभावी मोठी हेळसांड होत असल्याने कोरोनाचा कहर वाढत आहे. बुधवारी नवीन २२ बधितांसह कोरोना संसर्ग बधितांची संख्या ४५९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ पश्चिम भागातील बेपत्ता झालेले हे तीन रुग्ण सिद्धार्थनगर, शिवनगर भागातील असून त्यांचा कोरोना अहवाल आल्यानंतर पालिकेने त्यांचा शोध घेण्यास प्रयत्न केला. मात्र ते आढळून आले नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाने थेट त्यांची नावे, मोबाईल नंबर जाहीर केले आहेत त्यांच्या संपर्कातील इतरांना माहिती मिळेल या दृष्टीने ही नावे जाहीर केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या रुग्णाबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ नगरपालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी केले आहे.


मंत्र्यांना डावलूण मंत्रिमंडळात प्रस्ताव पाठवणाऱ्या सहसचिव सतीश सुपे यांची बदली झाली आहे. वित्त विभाग पदी सतीश सुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


मुंबईतील कॉफ्रर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वाचा 

मुंबईतील क्रॉर्फड मार्केटमध्ये भीषण आग, अग्नीशामनदलाच्या गाड्या दाखल

मुंबईतील क्रॉर्फड मार्केटमध्ये भीषण आग, अग्नीशामनदलाच्या गाड्या दाखल

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜೂನ್ 11, 2020


आजपर्यंत १.६५ लाख भारतीय मायदेशी परतले आहेत. यात २९ हजार ३४ स्थलांतरित कामगार आहेत तर १२ हजार ७७४ विद्यार्थी आणि ११ हजार २४१ व्यावसायिक आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे.


मुंबईतील घाटकोपरमध्ये तीन वर्षांचा मुलगा नाल्यात पडला. भारतील नौदल आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.


देशातील रिकव्हरीचा रेट ४९.२१ टक्के आहे. सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही अॅक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितलं.


औरंगाबादमध्ये नव्या १३२ रुग्णांची वाढ

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत असून आज मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेकॉर्ड मोडला असून औरंगाबादमध्ये १३२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४०७ झाली आहे. तर यापैकी १ हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. तर १२१ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (सविस्तर वाचा)


आळंदीमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

आषाढी वारी पालखी सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला असताना श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या परिसरालगत राहणाऱ्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंदिरालगतचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून मंदिर परिसरात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. (सविस्तर वाचा)


कोरोनाचं संकट म्हणजे भारतासाठी टर्निंग पॉइंट

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर भारतचा नारा देणारं संबोधनपर भाषण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऑनलाई कार्यक्रमात केलं. यावेळी पंतप्रधानांनी भारत आणि भारतीय कशा पद्धतीने या संकटाचा सामना करत आहेत आणि करणार आहेत, त्याविषयी देखील भाष्य केलं…(सविस्तर वाचा)


भारतात कोरोनाचा कमी प्रभाव

भारताची लोकसंख्या आणि गर्दी (लोकसंख्येची घनता) या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर भारत हे कोव्हीड १९ साठी मोकळे रान आहे. भारताच्या एक चतुर्थांश लोकसंख्या असलेल्या अमेरिकेने २० लाखाचा आकडा पार केला आहे. लक्षणे न दाखवणारी आणि म्हणून टेस्ट न झालेली लोकसंख्या पॉजिटिव्ह संख्येच्या दहा पट असेल असा अंदाज आहे. एकूण दोन कोटी लोक अमेरिकेत बाधित असावेत. एक लाखाहून जास्त मृत्यू अमेरिकेत झालेले आहेत. अनेक लोकांना कोरोना होतो पण प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोणतीही लक्षणे न दाखवता तो संपूर्ण बरा होतो. सहाजिकच या लोकांना टेस्ट केले जात नाही. त्यामुळे त्यांची पॉजिटीव्ह म्हणून गणना होत नाही. (सविस्तर वाचा)


जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९९६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ८६ हजार ५८९ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ३७ हजार ४४८ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ४१ हजार २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात बुधवारी तब्बल ३ हजार २५४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ९४ हजार ४१ वर पोहोचली आहे. यापैकी ४४ हजार ५१७ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज दिवसभरात १४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या ३ हजार ४३८ वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात १ हजार ८७९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -