घरCORONA UPDATECorona Live Update: ठाण्यात १७४ रुग्ण वाढले; तिघांचा मृत्यू!

Corona Live Update: ठाण्यात १७४ रुग्ण वाढले; तिघांचा मृत्यू!

Subscribe
ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन १७४ रुग्णांची वाढ झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाण्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४ हजार ८२९ वर पोहचला आहे. एकाच दिवशी ९१ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.
शुक्रवारी नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये वागळे प्रभाग समितीत सर्वाधिक ३५ रूग्ण आढळून आले. त्याखालोखाल मुंब्रा प्रभागात ३२ रुग्ण, कळव्यात २५ रुग्ण, माजीवडा  मानपाडा १८ रुग्ण, उथळसर आणि लोकमान्य सावरकर नगर प्रत्येकी १७ रुग्ण, नौपाडा कोपरी १६ रुग्ण वर्तकनगर ८ आणि दिवा प्रभागसमितीत ६ रुग्ण आढळून आले आहेत. मृत पावलेल्या तीन रूग्णांमध्ये २ पुरूष आणि १ महिला रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १४८ झाली आहे. आतापर्यंत २२५४ रूग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत हे प्रमाण ४८ टक्के आहे. तर सध्या २४२७ रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहे.

भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ३७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात २३ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण आणि शहरात एकूण ६० नवे रुग्ण आज आढळले आहेत.

दरम्यान भिवंडी शहरात आतापर्यंत ४३२ रुग्ण आढळले असून त्यापैकी १६४ रुग्ण बरे झाले आहेत. तर २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून २४७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत २३२ रुग्ण आढळले असून त्यापैकी ९२ रुग्ण बरे झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून १३६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान शुक्रवारी आढळलेल्या ६० नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर आणि ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ६६४ वर पोहचला असून त्यापैकी २५६ रुग्ण बरे झाले आहेत तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३८२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ३७२ रुग्ण आढळले असून ९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५ हजार ३५७ झाला असून मृतांचा आकडा २ हजार ४२ झाला आहे. तसेच २४ तासांत ९४३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २५ हजार १५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

गोव्यात आज कोरोनाचे ४६ नवे रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा ४६३वर पोहोचला आहे.

- Advertisement -

राज्यात मागील २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ४९३ रुग्ण आढळले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १ हजार १४१वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ३ हजार ७१७ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ७१८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४७ हजार ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


मागील ४८ तासांत राज्यात १२९ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ३ हजार ३८८ झाला असून आतापर्यंत ३६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ९४५ पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा


पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत पाकिस्तानाचे कोरोना ६ हजार ४०० रुग्ण आढळल्याचे समोर आले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सूट दिली आहे. सविस्तर वाचा


कोरोना राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वरही पोहोचला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खुलं पत्र लिहून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेटायला किंवा शुभेच्छा द्यायला न येता लोकांना मदत करा असं सांगितलं आहे. मात्र, आता खुद्द कृष्णकुंजपर्यंत कोरोना पोहोचल्याचं समोर येत आहे. राज ठाकरेंच्या तीन सुरक्षारक्षक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली होती. मात्र, या तिघांनीही कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. (सविस्तर वाचा)


भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र, असे असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत असून आज औरंगाबादमध्ये ९४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ५२४ झाली आहे. तर यापैकी १ हजार ३६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले परतले आहेत. तर १२८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता १ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. (सविस्तर वाचा)


देशभरात २४ तासांत १० हजार ९५६ नवे

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ४१ हजार ८४२ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ४७ हजार १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखाच्या वर

जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखाच्या वर गेला आहे. तर ४ लाख २० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगातील १८८ देशांवर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला झाला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काल रात्री धनंजय मुंडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही समजते. यामध्ये त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मात्र मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याचे सांगितले जात आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईमध्ये गुरुवारी १५४० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९८५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९५२ वर पोहोचला आहे. तसेच गुरुवारी ५१६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २७ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ झाला असून मृतांचा आकडा ३ हजार ५९०वर पोहोचला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ५६१ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४६ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या राज्यात ५ हजार ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संख्यात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी १०२ पुरुष तर ५० महिला आहेत. तसेच १५२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८५ रुग्ण आहेत तर ५४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १५२ रुग्णांपैकी १०७ जणांमध्ये (७०.३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -