Corona Live Update: भिवंडीत एकाच दिवशी ५३ नवे रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट
भिवंडीत मंगळवारी एका दिवसात कोरोनाचे तब्बल ४२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात ११ नवे रुग्ण आढळले असून ग्रामीण भागातील काल्हेर येथील ३४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मंगळवारी ग्रामीण भागात आणि शहरात एकूण ५३ नवे रुग्ण आढळले आहेत.
भिवंडी शहरातील आतापर्यंत ३२६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर शहरातील २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून १७२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत १८३ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच चार रुग्णांचा मृत्यू झाला असून १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान मंगळवारी आढळलेल्या ५३ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर आणि ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ५०९ वर पोहचला असून त्यापैकी २१० रुग्ण बरे झाले आहेत. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून २७४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

अंबरनाथचे पाहिले उपनगराध्यक्ष  प्रदीप खानविलकर यांचे काल रात्री वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. नुकतेच ते बदलापूर येथे वास्तव्यास गेले होते.

११९५ मध्ये अंबरनाथ नगरपालिकेची प्रथम निवडणूक झाली तेव्हा सत्ताधारी शिवसेनेतर्फे ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांना उपनगराध्यक्ष पद देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ते पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःचा मुद्रण व्यवसाय आणि एमआयडीसी मध्ये एक कारखाना सुरू केला होता.

काल सोमवारी दिवसभर खानविलकर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांची पालिकेमार्फत कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर ते बदलापूरला आपल्या घरी निघून गेले. काल सायंकाळी पुन्हा त्यांना त्रास जाणवल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र कोरोनाचा अहवाल नसल्याने कोणतेच रुग्णालय दाखल करून घेण्यास तयार नव्हते, त्यातच त्यांच्या घरी मृत्यू झाला.


मुंबईत आज कोरोनाचे १ हजार १५ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजार ८७८ वर पोहोचला आहे. तर मुंबईत आज ५८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १ हजार ७५८ झाला आहे. तसेच आज ९०४ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत मुंबईत २२ हजार ९४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


आज राज्यात कोरोनामुळे १२० जणांचा मृत्यू झाला असून २ हजार २५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा ३ हजार २८९वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजार ७८७ झाला आहे. तसेच आज राज्यात १ हजार ६६३ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आजपर्यंत ४२ हजार ६३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सविस्तर वाचा 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना अहवाला निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

 


कोलकाता कार्यालयातील सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांना होम क्वारंटाईनला सल्ला दिला आहे.


भारतीय रेल्वेन राज्य सरकारला कळविले आहे की, राज्यांकडून मागणी केल्यानंतर २४ तासांत श्रमिक स्पेशल ट्रेन उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहितील रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. अंदाजे ६० लाख लोकांना स्थळांतरित मजूरांना आपल्या राज्यात नेण्यासाठी भारतीय रेल्वेमार्फत आतापर्यंत ४ हजार ३४७ श्रमिक स्पेशल ट्रेन सोडल्या गेल्या आहेत. १ मेपासून श्रमिक ट्रेन धावल्या.


बृहन्मुंबई महानगरपालिककेने लॉकडाऊन मुदतवाढीच्या परिपत्रकात काही निर्बंध शिथील केले आहेत. तसेच लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकरता दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तर पोलीस प्रशासन दलातील २ हजार ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ६६ हजार ५९८ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख २९ हजार २१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार ४६६ जणांचा मृत्यू झालेला आहे. (सविस्तर वाचा)


रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबादच्या गणेश नगर येथील ३८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे. या रुग्णावर घाटी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, आज, मंगळवारी त्यांनी पहाटे धूम ठोकली आहे. (सविस्तर वाचा)


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत.


महापालिका कर्मचारी करोनाने दगावल्यास वारसांना ५० लाख

करोना संसर्ग काळात महापालिका कर्मचारी कामावर असताना एखादा कर्मचारी करोनाने दगावल्यास त्याच्या वारसांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी केली. १ मार्च ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे.या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य करण्यात येणार आहे. त्यामुळे करोनामुळे दगावणार्‍या पालिका कर्मचार्‍यांच्या वारसांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक भरपाई देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. (सविस्तर वाचा)


पहिल्यांच दिवशी एसटी-बेस्टचा उडाला फज्जा; फिजिकल डिस्टन्सिंग वाजले तीन तेरा!

मिशन बिगीन अगेन अंतर्गत सोमवारपासून खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचार्‍यांसह काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी बेस्ट आणि एसटी बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र पहिल्याच दिवशी पूर्ण:ता बेस्टआणि एसटी बसेसचा फज्जा उडाला आहे. अपुर्‍या बस फेर्‍यामुळे सकाळीपासून अनेकांनी बेस्ट बसेस पकडण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तर अनेकांना बसमध्ये उभे राहूण प्रवास करण्याची वेळ आली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पुर्णता तीन तेरा वाजले. तसेच यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आणि कामगारांनी लोकल सेवा काही अंशत: सुरू करण्याची मागणी शासकीय कर्मचार्‍यांनी केली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनामुळे १०९ जणांचे बळी गेले आहेत. तसेच एका दिवसात २ हजार ५५३ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ३ हजार १६९ वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ झाला आहे. तसेच एका दिवसात १ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण ४० हजार ९७५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.