घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत २४ तासांत १३८१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Corona Live Update: मुंबईत २४ तासांत १३८१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत २४ तासांत १ हजार ३८१ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर गेल्या ४८ तासांत ६२ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८७ हजार ५१३वर पोहोचला असून मृत्यूंचा आकडा ५ हजार ६१ झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ६०३ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख २३ हजार ७२४ वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार ४४८ झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत ४७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या ५ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण ४ हजार ९४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतपर्यंत १५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज धारावीत ३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३३८वर पोहोचला आहे. यापैकी ३४९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ६५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -


देशात गेल्या २४ तासांत १६ हजार ८८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ४ लाख ५६ हजार ८३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट हा ६१.५३ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


राज्यात ४८ तासांत २७८ कोरोनाबाधित पोलीस आढळले असून एक पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ११३ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ७१ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.


भाजप आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यांच्या मुलांचा देखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात १६६ रूग्णांची वाढ; एकूण ३२७ जणांचा कोरोनाने मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असून मुंबई पुण्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९ तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये ९२ पुरूष तर ७४ महिलांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ३०० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात एकूण ३२७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार १४९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणी करण्यात आलेल्या १ हजार ३ जणांच्या स्वॅबपैकी बुधवारी १६६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


कुंकू लावलेल्या लिंबाचा प्रसाद खाऊन २० जणांना कोरोना

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने दिलेला लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाल्ल्याने तब्बल २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भोंदूबाबावर कडक कारावई करण्याची मागणी केली जात आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षां होणार की नाही या संबंधी उच्च तंत्र आणि महाविद्यालय शिक्षण मंत्री उदय सामंत उद्या दुपारी ४ वाजता सर्व आक्षेपांवर खुलासा करणार असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 


देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांशी चर्चा

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभागावर ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा रूग्णालयास भेट देत कोरोनाबाधित रूग्णांशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मागील मागील २४ तासांत देशात २२ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ७ लाख ४२ हजार ४१७ वर पोहोचली असून मृतांची संख्या २० हजार ६४२ झाली आहे. तसेच २ लाख ६४ हजार ९४४ active केसेस असून ४ लाख ५६ हजार ८३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दिवसात १ लाख नवीन रुग्णांची भर पडली असून अवघ्या पाच दिवसांत संसर्गाची प्रकरणे सहा लाखांवरुन सात लाखांवर गेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने दिलेला लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाल्ल्याने तब्बल २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भोंदूबाबावर कडक कारावई करण्याची मागणी केली जात आहे. (सविस्तर वाचा)


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २२ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४२ हजार ४१७ वर पोहोचली असून मृतांची संख्या २० हजार ६४२ झाली आहे. तसेच २ लाख ६४ हजार ९४४ active केसेस असून ४ लाख ५६ हजार ८३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


कोरोनाचा कहर देशभरात सुरू असून पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह आता निमलष्करी दलातील जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. नुकतीच धक्कादायक माहिती समोर येत असून निमलष्करी दलांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. (सविस्तर वाचा)


विधानभवनातील दोन लिपिकांसह सहा ते सात बंदोबस्तावरील पोलिसांना ही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार १३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २२४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १७ हजार १२१वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार २५० झाला आहे. तसेच २४ तासांत ३ हजार २९५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -