घरCORONA UPDATECorona Live Update: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावासियांना संबोधित करणार

Corona Live Update: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावासियांना संबोधित करणार

Subscribe
उद्या सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. सविस्तर वाचा 

मुंबईत मागील २४ तासांत १ हजार २४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७६ हजार २९४वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ४६१वर पोहोचला आहे. सविस्तर वाचा


ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच सोमवारी ३३८ नवीन रुग आढळून आले तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यू संख्येमुळे चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -
ठाण्यात दररोज तीनशेपार रुग्णांची संख्या आढळून येत आहे. आतापर्यंत रुग्णांचा आकडा ८ हजारवर पोहोचला आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. आज एकाच दिवशी १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतचा मृतांचा आकडा २९२ झाली आहे. सध्या ४२३१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३९८३ रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. त्यामुळे कोरोनाची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पुन्हा दहा दिवसाचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

आज राज्यात ५ हजार २५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ६९ हजार ८८३वर पोहोचला असून मृतांचा आकडा ७ हजार ६१० झाला आहे. तसेच आज २ हजार ३८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत राज्यात ८८ हजार ९६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५२.३७ टक्के इतका आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

आज धारावीत १७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार २६२वर पोहोचला असून आतापर्यंत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ५९८ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सलग सहाव्या दिवशी औरंगाबादमध्ये २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज तब्बल २०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये १२३ पुरुष, ७९ महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण ५ हजार २३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ५५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २४७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी देशात अडीच महिने Lockdown लावण्यात आला होता. त्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले. हातावर पोट असलेल्या लोकांचं जीवन संकटात सापडलं होतं. या काळात आत्महत्या आणि कौटुंबीक हिंसाचारात (Domestic violence) वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं उघड झालं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (National Women Commission) महिलांवरच्या अत्याचारात मोठी वाढ झाल्याची माहिती दिली आहे.


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १९ हजार ४५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहोचली असून मृतांची संख्या १६ हजार ४७५ झाली आहे. तसेच २ लाख १० हजार १२० अॅक्टिव्ह केसेस असून ३ लाख २१ हजार ७२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


भारताच्या निमलष्करी दलांमध्ये कोरोना पसरू लागला असून सीमा सुरक्षा दल (Border Security Force) अर्थात बीएसएफच्या २१ जवानांना गेल्या २४ तासांत कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. यापैकी १८ जण कोरोनामुक्त झाले असून ३०५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ६५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


आतापर्यंत एकूण ८३ लाख ९८ हजार ३६३ जणांचे अहवाल घेण्यात आले असून काल रविवारी १ लाख ७० हजार ५६० जणांची तपासणी करण्यात आली आहे.


मुंबईमध्ये कोरोनाचे १३०० नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतानाच दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल १३०० नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता ७५ हजार ४७ इतका झाला आहे. त्यासोबतच आज दिवसभरात २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आता मुंबईतल्या मृतांचा आकडा देखील ४ हजार ३६९च्या घरात गेला आहे. आजच्या दिवसातली दिलासादायक बाब म्हणजे २४ तासांत ८२३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळे कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ४३ हजार १५४ इतका झाला असून मुंबईतल्या अॅक्टिव रुग्णांची संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. (सविस्तर वाचा)


२५ दिवसांत ५ लाख परप्रांतीय मुंबईत परतले!

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हाताला काम आणि पोटाला भाकरी नसल्याने मिळेल त्या वाहनाने गावी गेलेले मुंबईतील परप्रांतीय मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने मुंबईत परतू लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दोन एक महिन्यातच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने मातृभूमीपेक्षा त्यांना शेवटी कर्मभूमीची ओढ लागली. शेवटी मुंबईच त्यांना जगवणार असल्याने त्यांच्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता, परिणामी १ जून ते २५ जून या २५ दिवसांच्या कालावधीत विशेष ट्रेनच्या माध्यमातून ४ लाख, ८१ हजार ९८३ परप्रांतीय मजूर मुंबईत परतले आहेत. मुंबईत परतणार्‍या मजुरांमध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशची आहे. विशेष म्हणजे परप्रांतीय गावाला जाऊन परतले तरी मराठी माणूस अजून विचारतोय, ‘गावाला जायला परवानगी मिळेल का हो?’ (सविस्तर वाचा)


राज्यात रविवारी ५४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ६४ हजार ६२६ झाली आहे. तर ७०,६०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात १५६ मृत्यू झाले असून मृतांची संख्या ७ हजार ४२९ झाली आहे. मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. राज्यात नोंदविलेल्या १५६ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ९६ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, ठाणे २४, जळगाव ६, जालना १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे. रविवारी २३३० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८६,५७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के एवढे झाले आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -