घरताज्या घडामोडीरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक; ४७ नव्या रुग्णांची वाढ

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक; ४७ नव्या रुग्णांची वाढ

Subscribe

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी ४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ६६१ वर गेला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, असे असून देखील रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा रूग्णालय १७, कळंबणी (खेड) १३, दापोली ग्रामीण रूग्णालय १२, कामथे (चिपळूण) उपजिल्हा रूग्णालय आणि संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय प्रत्येकी २ आणि मंडणगड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६१ इतकी झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कडक टाळेबंदी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक टाळेबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात १ ते ८ जुलै हा आठवडाभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली होती. दरम्यान, रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात ११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

- Advertisement -

राज्यात बुधवारी ५५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार २९८ झाली आहे. तर active रुग्ण ७९ हजार ७५ झाले आहेत. राज्यात १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ८०५३ वर पोहोचली आहे. राज्यात नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर २६, ठाणे मनपा १७, कल्याण डोंबिवली ४, जळगाव ३, पुणे ३,नवी मुंबई १, उल्हास नगर १, भिवंडी १, पालघर १, वसई विरार १, धुळे १ आणि अकोला १ यांचा समावेश आहे.


हेही वाचा – मुंबईत ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -