घरताज्या घडामोडीLockdown - मुंबईसह राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना सुरूवात!

Lockdown – मुंबईसह राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना सुरूवात!

Subscribe

मॉन्सुन ६ आठवड्यावर येऊन ठेपलेला असतानाच आता अनेक यंत्रणा मॉन्सुनपूर्व कामे करण्याच्या तयारीला लागल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम आता पुन्हा एकदा सुरू झाले आहे. अनेक प्रकल्पाच्या ठिकाणी आता कामगारांची जुळवाजुळव आणि कामाची सुरूवात करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग प्रकल्प, सायन फ्लायओव्हर, मुंबई पुणे एक्सप्रेस वे अशा सगळ्या पायाभूत प्रकल्पांचे काम आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन या कामाला सुरूवात करण्यात येत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक कामगारासाठी ओळखपत्राची व्यवस्था या लॉकडाऊनच्या काळात करण्यात येत आहे. मॉन्सुनपूर्व कामेही तातडीने करणे गरजेचे असल्यानेच आता अनेक यंत्रणा कामासाठी लागल्या आहेत.

नागपुर मुंबई समृद्धी महामार्गावर जवळपास १८ हजार कामगार कार्यरत आहेत. या कामगारांची व्यवस्था ही कॅम्पच्या ठिकाणी करण्यात आली आहे. अनेक कामे ही मशीनवर आधारीत असल्याचे याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा निकष पाळला जाईल याची खबरदारी घेण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहसंचालक अनिल गायकवाड यांनी दिली. नागपुर मुंबई राज्यातील समृद्धी महामार्गाचे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर परवानगी मिळत असल्यानेच आता ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. समृद्धी महामार्गाची कामे करताना आवश्यक खबदारी घेऊन कामाला सुरूवात करावी असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळेच आता वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंगचा निकष पाळण्याचे आदेश दिले आहेत. सध्या विविध ठिकाणी कॅम्पमध्ये असलेल्या कामगारांकडूनच कामे केली जावेत, तसेच कोणताही नवीन कामगार कामासाठी आणू नये असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. कॅम्प साईट सोडून जाण्यास पुर्णपणे प्रतिबंध करावा. दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये किराणा माल, आवश्यक गोष्टींची पुर्तता कंत्राटदारांनीच करावी असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कोणत्याही कामगाराला कोरोनाची लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला कळवावे. तसेच कंत्राटदाराने स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी नेण्याची व्यवस्था करावी. कोरोना विषयक माहिती आणि मार्गदर्शक सूचनाही कंत्राटदाराने द्याव्यात. तसेच सूचनांचे पालन करण्याची खबरदारी कंत्राटदाराने घ्यावी असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

मॉन्सुन ६ आठवड्यावर येऊन ठेपलेला असतानाच आता अनेक यंत्रणा मॉन्सुनपूर्व कामे करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. रस्त्यांची तसेच मलनिसारण विभागाची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. म्हणूनच आता मॉन्सुनपूर्व कामाला सुरूवात झाली आहे. मुंबई मेट्रोच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही सुरूवात केली आहे. मालवणी कास्टिंग यार्डच्या कामाला सुरूवात झाली आहे. तर मेट्रो ३ च्या कामालाही सुरूवात झाली आहे. मुंबईतल्या सायन फ्लायओव्हरचे कामही येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. आतापर्यंत ५० टक्के पुर्ण झाले आहे. तर उर्वरीत काम येत्या दिवसांमध्ये पुर्ण करण्यात येणार आहे.


हे ही वाचा – CoronaVirus- आता नर्सेसची राहण्याची सुविधा होणार विभागातील हॉटेलमध्ये!

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -