घरमहाराष्ट्रतळीरामांची प्रतिक्षा आणखी वाढणार, मद्यविक्रीची होम डिलिव्हरी १ दिवस लांबणीवर!

तळीरामांची प्रतिक्षा आणखी वाढणार, मद्यविक्रीची होम डिलिव्हरी १ दिवस लांबणीवर!

Subscribe

निर्णयात बदल करून हा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे तळीरामांना आता १५ तारखेची वाट पहावी लागणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान तळीरामांसाठी मद्याची दुकानं उघडल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. यानंतर मद्यपींना होम डिलिव्हरी सेवेच्या माध्यमातून घरपोच मद्यविक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यांची चांगलीच सोय झाली आहे, असे म्हणता येईल. मात्र ही सेवा घेण्यासाठी त्यांना अजून एक दिवस वाट बघावी लागणार आहे. दरम्यान, गुरुवारी १४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून ही सेवा सुरु होणार होती. मात्र या निर्णयात बदल करून हा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे तळीरामांना आता १५ तारखेची वाट पहावी लागणार आहे.

मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद करण्यात आली असले तरी केंद्र सरकारने ३ मे नंतर दिलेल्या निर्देशांनुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्या अटींचे उल्लंघन होत असल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.

- Advertisement -

मद्यविक्रीची होम डिलिव्हरी १ दिवस लांबणीवर

१४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली होती. परंतु आता नव्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळवणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे अशा प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी १४ तारखेऐवजी १५ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

अशा असतील अटी आणि शर्थी

फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. याशिवाय घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. सोबतच डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे, अशी माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली. तसेच, डिलिव्हरी करणाऱ्यांना ओळखपत्र दिलं जाणार असून बंधनकारक असणार आहे. यासाठी मद्य दुकानदारांनी डिलिव्हरीसाठी पाठवण्यात येणाऱ्यांची माहिती देणं आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -