घरCORONA UPDATECoronavirus: महाराष्ट्राची चिंता वाढली; रुग्णसंख्या २४५५, आज १२१ नवे रुग्ण

Coronavirus: महाराष्ट्राची चिंता वाढली; रुग्णसंख्या २४५५, आज १२१ नवे रुग्ण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. आता ३ मे पर्यंत देशभरात १९ दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. लॉकडाऊन वाढवला असला तरी राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. आज १२ तासांत नवे १२१ रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची एकूण संख्या २४५५ वर पोहोचली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात मागच्या १२ तासांत १२१ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्हा आणि महापालिकेप्रमाणे आकडेवारी पुढीलप्रमाणे –

- Advertisement -

मुंबई – ९२

नवी मुंबई – १३

- Advertisement -

ठाणे – १०

वसई-विरार – ५

रायगड – १

एकूण – १२१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -