घरताज्या घडामोडीकोरोनाचा हॉटस्पॉट ठरणाऱ्या अकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणाऱ्या अकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी

Subscribe

लॉकडाऊन वाढण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी जाहीर केली असून १ ते ६ जून दरम्यान ही संचारबंदी लागू असणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात चौथ्यांदा लॉकडाऊन करण्यात आला. मात्र, आता हा चौथा टप्पा संपत आला असून पुन्हा लॉकडाऊन वाढणार का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. लॉकडाऊन ४ हा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे १ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, लॉकडाऊन वाढण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी जाहीर केली आहे. १ ते ६ जून दरम्यान ही संचारबंदी लागू असणार आहे. विदर्भातील अकोला हा करोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

अकोल्यात येत्या १ ते ६ जूनपर्यंत कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व काही बंद राहणार आहे. अकोल्यात दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक स्तरावर क्वॉरंटाईन करण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. प्रत्येक विभागाचे मूल्यांकन केले जाणार आहे. मूल्यांकनात काही चुकीचे आढळले तर कारवाई केली जाईल. तसेच मेडिकल कॉलेजमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, या कर्फ्यू काळात संचारबंदीत मेडिकल तसेच शेतीच्या काही कामांना सवलत देणार आहोत. मात्र, ज्या व्यक्ती याकाळात नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

अकोल्यात ५०८ कोरोनाबाधित

अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून रुग्णांचा आकडा ५०८ वर गेला आहे. तर आतापर्यंत २८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona : पुण्यात रुग्णसंख्येने ओलांडला ५५००चा टप्पा; १७१ रुग्ण अत्यवस्थ!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -