घरCORONA UPDATE'राज्यात कुणाचे सरकार आहे याचा विचार करण्यापेक्षा एकत्र राहून मदत करा'

‘राज्यात कुणाचे सरकार आहे याचा विचार करण्यापेक्षा एकत्र राहून मदत करा’

Subscribe

कोरोनापाठोपाठ आता राज्यावर एक दुसरं संकट येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

‘देशात कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हे कोरोनाचे संकट असतानाच आता राज्यावर एक दुसरं संकट येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेक उद्योग बंद आहेत. त्यामुळे कामगारांची जबाबदारी, वाढणारे कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे आता  राज्यावर कोरोनापाठोपाठ ‘अर्थसंकट’ येणार आहे’, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

दरम्यान, मंगळवारी वांद्रे इथे कुणी तरी रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरवली आणि त्यामुळे हजारो लोक तिथे जमा झाली होते. सातत्याने आपण सोशल डिस्टसिंगच्या सुचना केल्या आहे, त्याचे पालन केले जात नसल्याचे कालच्या प्रकारातून समोर आले. त्यामुळे कुणीही अशा अफवा पसरवू नये, वांद्रे इथे जे घडले ते पुन्हा घडू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

भाजपचे कान टोचले

‘राज्यात कोणाचे सरकार आहे याचा विचार करण्यापेक्षा एकत्र राहून मदत करणे गरजेचे आहे. कारण राज्याला येणाऱ्या काळात काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या काळात सर्वच जण एकत्र येऊन मदत करणे अपेक्षित आहे. पण, अशा परिस्थितीत राजकारण कुणीही करू नये’, असे सांगत त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनसंवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, ‘कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. तसेच ते शेतकऱ्यांवर आलेले देखील आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. तसेच याचे परिणाम येत्या एक ते दोन वर्षात जाणवतील’, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या सूचनांचे पालन करावे

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन केला होता. मात्र, पंतप्रधानांनी हा लॉकडाऊन ३ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री घरातून बाहेर पडू नका, असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनांचे पालन करा आणि कोरोनाला हरवा’, असे देखील ते पुढे म्हणाले.

कोरोनाचा अर्थकारणावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. उत्पादनाची साखळी देखील ठप्प झाली आहे. त्यामुळे उद्योग आणि इतर क्षेत्रही आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा राज्यावर विपरित परिणाम जाणवणार आहे. राज्यात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. त्यामुळे आतापासून उपाययोजना करण्याची गरज असून सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत’, असे देखील ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – Lockdown Crisis: वांद्रे गर्दी प्रकरणी एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णीला अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -