घरCORONA UPDATECoronaVirus: राज्यातील पहिल्या करोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज!

CoronaVirus: राज्यातील पहिल्या करोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज!

Subscribe

राज्यात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशभरातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. मात्र आता राज्यात करोनाबाधित म्हणून नोंद झालेल्या पहिल्या दाम्पत्याला डिस्चार्ज मिळाला आहे. हे दाम्पत्य पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार घेत होते. पण त्यांची आता करोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने ते व्हायरस फ्री झाले आहे. नायडू रुग्णालयातून त्यांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे या दाम्पत्याचा गुढीपाढवा नक्की स्पेशल झाला आहे.

दुबईहून परतल्यानंतर या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्यामुळे ९ मार्च रोजी होळीच्या दिवशी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चौदा दिवसांनी त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळेस त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मग दोन ते तीन दिवसांनी पुन्हा नमुने घेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली आणि करोनाची त्यांची दुसरी चाचणी देखील निगेटिव्ह आली. त्यामुळे आज गुढीपाढव्या दिवशी त्यांना डिस्जार्च देण्यात आला आहे.

- Advertisement -

तसंच या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मुलीला आणि वाहन चालकाला करोनाची लागण झाली होती. सध्या या दोघांवरही उपचार सुरू आहेत. आज दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसंच वाहन चालकाच्या दुसऱ्या करोचा चाचणी रिपोर्ट यायचा आहे. या वाहन चालकाची पहिली करोना चाचणी निगेटिव्ह आली होती.


हेही वाचा – CoronaVirus : करोना अजून पसरला, सांगलीत ५ जणांना लागण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -