घरताज्या घडामोडीशिक्षकांनाही 'वर्क फ्रॉम होम'; बोर्डाचे पेपर घरीच तपासणार

शिक्षकांनाही ‘वर्क फ्रॉम होम’; बोर्डाचे पेपर घरीच तपासणार

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करणार असून घरातूनच बोर्डाचे पेपर तपासले जाणार आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहिर केली होती. त्यानंतर शिक्षण मंडळाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केल्या असून फक्त नववी आणि अकरावीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शिक्षकांना शाळेत जावे लागत होते. परंतु, आता शिक्षक देखील वर्क फ्रॉम होम करणार आहेत. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना घरीच तपासण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून यासंदर्भात एक पत्रक मंडळाने जारी केले आहे. राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर चिंतेत असलेल्या शिक्षकांना राज्य सरकारने हा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे.

शिक्षकांनाही ‘वर्क फ्रॉम होम’

सध्या दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तापसणीवरून सुरू असलेल्या गोंधळावर शिक्षण विभागाने हा तोडगा काढला आहे. त्यामुळे शिक्षकांनाही आता ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे. बोर्डामार्फत १८ फेब्रुवारीला ते १८ मार्च दरम्यान बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. तर दहावीची परिक्षा ३ मार्च ते २३ मार्च दरम्यान, पार पडणार होती. मात्र, करोनाचा फैलाव अधिक वाढल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. या पेपरची तारीख अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. मात्र, असे असले तरी उत्तपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम सुरु करण्यासंदर्भात बोर्डाने महत्वाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

‘महाराष्ट्रातील करोनाचा प्रसार वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळेत येऊन उत्तपत्रिकांचे परीक्षण आणि नियमन करण्यात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणे आवश्यक असल्याने खास बाब म्हणून केवळ या परीक्षेच्या उत्तरपत्रिका काही अटी आणि शर्तीसहीत शिक्षकांना घरी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार बोर्डाने शिक्षकांना दिला देत या आदेशाचे पालन करत उत्तरपत्रिका घरी देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे बोर्डाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

शिक्षकांना घालण्यात आलेल्या अटी

  • उत्तपत्रिका मोजून आणि सुस्थितीमध्ये असल्याची खात्री करुन शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून किंवा कनिष्ठ.
  • उत्तरपत्रिकांचे परीक्षण आणि नियमन घरातून करताना त्याची पूर्णत: गोपनीयता आणि सुरक्षिता राखली जाईल याची संबंधित शिक्षकांनी दक्षता घ्यावी.
  • ही परवानगी केवळ या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांपूर्ती देण्यात आली आहे.
  • महाविद्यालयाच्या संबंधित प्रमुखांकडून ताब्यात घ्याव्यात.
  • उत्तरपत्रिकांचे परीक्षण किंवा नियमन वेळेत पूर्ण करुन त्या विहित पद्धतीने गोपनीयता आणि सुरक्षितता विचारात घेऊन संबंधितांकडे हस्तांतरीत कराव्यात.
  • आपल्याकडील उत्तरपत्रिका खराब होणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची सर्वोतोपरी दक्षता शिक्षकांनी घ्यावी.

    हेही वाचा – Coronavirus : करोनाबाधितांची चाचणी १४ दिवसांनंतर निगेटिव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -