राज्यात आज ४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद; २४५ मृत्यू

राज्यात आज १ हजार ९५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

corona in maharashtra

राज्यातील कोरोनाबाधितांचा दिवसागणिक आकडा वाढतच चालला आहे. राज्यात आज ४ हजार ८७८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज २४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ९५ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १ हजार ९५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ८८ हजार ९६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.३७ टक्के एवढं आहे.

राज्यात ४ हजार ८७८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ७६१ झाली आहे. त्यापैकी ७५ हजार ९७९ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ९ लाख ६६ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ७४ हजार ७६१ (१८.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.