Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Coronavirus : नागपूरमधील 'औषध बँक' ठरतेय कोरोना रुग्णांसाठी वरदान

Coronavirus : नागपूरमधील ‘औषध बँक’ ठरतेय कोरोना रुग्णांसाठी वरदान

Related Story

- Advertisement -

देशासह राज्यात कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे आर्थिक घडी पुन्हा बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या गरीब कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न थांबले. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक गाडा ठप्प झाला आहे. दरम्यान नागपूरातील उद्योग, व्यापार, दुकाने, रोजंदारीची कामे पूर्णपणे बंद झाली आहेत. यात हातावर पोट असणाऱ्या हजारो श्रमजीवी कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली दोन महिने काम नसल्याने अनेक गरीब कुटुंबात दोनवेळची चुक पेटवणेही अवघड होत आहे. या जर कुटुंबात कोणाला कारोनाचा संसर्ग झाल्यासन औषधांअभावी रुग्णांचा जीव जात आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असले तरी औषधे घेण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत नागपूरमधील सिटीझन फोरम ही स्वयंसेवी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब कोरोनाग्रस्तांचा मदतीसाठी पुढे धावून आली आहे.

तरुणांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या संस्थेने सुरु केलेली औषध बँक दारिद्र रेषेखालील करोनाबाधित रुग्णांना या संकटातून बाहेर काढत आहे. परंतु कोरोना संसर्गाचा भीतीने सध्या जीवनाश्यक दुकाने वगळता सर्वच उद्योग, व्यापारी संस्था बंद ठेवण्यात आल्या. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या मजूर, कामगार, नोकरदार, श्रमजीवी, छोट्या व्यावसायिक, कामगारांना बसला. दरम्यान वाहतूक व्यवस्था बंद असल्याने , रिक्षाचालक, टॅक्सीचालकांपासून ते व्यापारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम बंद झाले.

- Advertisement -

शिवाय या लॉकडाऊनमुळे अनेकांचा नोकऱ्य़ा गेल्या, त्यात कुटुंबात कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर गरीब कुटुंबातील आजारग्रस्तांना उपचार करणे देखील अशक्य होत आहे. हीच गरज ओळखून नागपूर सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थेने गरीब कुटुंबातील कोरोनाग्रस्तांचा मदतीसाठी औषध बँक सुरु केली आहे. या संस्थेने आत्तापर्यंत शेकडो गरीब कुटुंबियांकडून एक रुपयाही न घेता कोरोनाग्रस्तांना निस्वार्थपणे लाखो रुपयांची औषधे मोफत दिली. सामाजिक जाणीवेतून तरुणांनी पुढाकार घेत औषध बँक आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब कोरोनाबाधित रुग्णांना जगण्यासाठी आशेचा किरण देत आहे.


 

- Advertisement -