घरताज्या घडामोडीCoronavirus: 'नागपुकरांनो ऐकलं नाही तर बळजबरीनं घरी बसाववं लागेल'

Coronavirus: ‘नागपुकरांनो ऐकलं नाही तर बळजबरीनं घरी बसाववं लागेल’

Subscribe

राज्यात दिवसेंदिवस करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपुरमध्ये आतापर्यंत चार करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्य सरकारने नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. हा निर्णय फक्त नागूपर शहरापुरतीच घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर आयुक्त तुकाराम मुंढेंनी नागपुरची पाहणी केली. या पाहणी दरम्यान नागपुरकर सरकारच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे असं होत असेल तर बळजबरीनं तुम्हाला घरी बसवावं लागेल, असं आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मी पाहणी केली असता मला दुकाचाकी आणि चारचाकी वाहन रस्त्यावर दिसत होती. त्यामुळे नागरिक सरकारच्या आदेश पाळत नाही, अशी तुकाराम मुंढे यांनी खंत व्यक्त केली.

नागपूर शहरातील लोकांमध्ये परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही आहे. लॉकडाऊन म्हणजे फक्त दुकाने बंद करणे असं नाही आहे. लॉकडाऊनचा अर्थ समजून घेतला पाहिजे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षतेसाठी घरात राहावं, असं मुंढे यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केलं.

- Advertisement -

आतापर्यंत नागपुरमध्ये नव्याने रुग्ण आढळला नाही आहे. नागपुरमध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने नागपूर लॉकडाऊन करण्यात निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असं मुंढे म्हणाले.


हेही वाचा – Coronavirus: लवकरच मेडिकल महाविद्यालयातही होणार करोना चाचणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -