Coronavirus : खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण

coronavirus ncp leader mp supriya sule and her husband sadanand sule tested corona positive
Coronavirus : खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनी कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन ही माहिती शेअर केली आहे. यात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केल आहे.


अलीकडेच हिवाळी अधिवेशनादरम्यानही राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह एका आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर विधानभवनात ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना रुग्णसंख्या वाढवण्यास कारणीभूत ठरतेय की काय अशी भीती व्यक्त होतेय.

अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा राज्यात निर्बंध लागण्याचे संकेत दिले आहेत. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या वाढतायत हा काळजीचा विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब टाक्स फोर्ससोबत बैठक घेण्यास सांगितले आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा निर्बंध वाढवण्याची गरज होऊ शकेल याविषयी या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे.

राज्यात २० जानेवारी दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ५०००-६००० दरम्यान होती. मात्र आता सक्रिय रुग्णांची संख्या ११, ४९२ झाली आहे. आज कदाचित ही संख्या २० हजारापर्यंत जाऊ शकते. तसेच मुंबईची परिस्थितीत पाहिली तर, २० जानेवारीदरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ३०० होती आणि आता १३०० झाली आहे. आज मुंबई सक्रिय रुग्णांची संख्या २२०० होण्याची शक्यता आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांनी वाढला असून तो चांगला नाहीये. त्यामुळे काळजी घेण्याची गरज वाढली आहे, असे राजेश टोपे म्हणाले.