Coronavirus: पुण्यातील कोरोनाबाधितांवर होणार ‘प्लाझ्मा थेरपी’

आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनानेही प्लाझ्मा थेरपीची तयारी सुरू केली होती.

sasoon hospital

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुण्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, चिंतेचं वातावरण असताना कोरोनाच्या रुग्णांना आणि पुणेकरांना दिलासा देणारी बातमी आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) परवानगी दिली आहे.

महाराष्ट्रात पुण्यातुन कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू मुंबई, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सध्या पुणे रेड झोनमध्ये आहे. अनेक वसाहतींना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं होतं. त्यामुळे आयसीएमआरने ही थेरपी वापरायला सुरूवात केली आहे.


हेही वाचा – IFSC मुंबईतून हलवण्याला पवारांचा विरोध, मोदींना लिहिले पत्र


दरम्यान, आता आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनानेही प्लाझ्मा थेरपीची तयारी सुरू केली होती. काही आठवड्यांपूर्वी प्लाझ्मा थेरपीची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. प्रशासनाची मागणी मान्य करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यास आयसीएमआरनं (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिली आहे.