घरCORONA UPDATECoronavirus: 'एक दिवा ज्ञानाचा आणि संविधानाचा'; मोदींनंतर आता पवारांचे आवाहन

Coronavirus: ‘एक दिवा ज्ञानाचा आणि संविधानाचा’; मोदींनंतर आता पवारांचे आवाहन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी देशातील लोकांना दिवे, मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र पवारांचे आवाहन जर हटके आहे. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांची तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. लॉकडाऊन असल्यामुळे दोन्ही महापुरूषांच्या जयंतीनिमित्त जाहीर कार्यक्रम घेता येणार नाहीत. त्यामुळे फुलेंच्या जयंतीला ‘एक दिवा ज्ञानाचा’ आणि आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ‘एक दिवा संविधानाचा’ लावूया असे आवाहन पवार यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या तेराव्या दिवशी फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधत असताना पवारांनी हे आवाहन केले. महाराष्ट्राच्या गृहखात्याने आपल्याकडील मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी दिली नाही. दिल्लीच्या पोलिसांना हे जमले नाही, असे सांगताना पवार म्हणाले की, पुढील काही दिवसांत शब ए बारात, क्रांतीसुर्य जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मात्र यादिवशी आपल्याला गर्दी न करता घरातच जयंती साजरी करायची आहे, असे सांगितले.

- Advertisement -

हे वाचा – Coronavirus: तबलीगी मरकजची बातमी वारंवार का दाखवली जातेय? – शरद पवार

जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी ज्ञानाचा संदेश दिला. त्यामुळे फुलेंच्या जयंतीला आपण एक दिवा ज्ञानाचा लावू. तर बाबासाहेबांनी सर्वांना न्याय, स्वातंत्र्य देणारे संविधान लिहिले म्हणून त्यांच्या जयंतीला आपण एक दिवा संविधानाचा लावू, असे आवाहन पवार यांनी केले. तसेच जोतीराव फुले यांनी अंधश्रद्धेचे कधी समर्थन केले नाही. अंधश्रद्धा व्यक्तीला दैववादी बनवते. जेव्हा माणूस दैववादी बनतो, तेव्हा तो चिकित्सा करण्याची प्रवृत्ती सोडून देतो. तेव्हा माणसाने चिकित्सेचा मार्ग कधीच सोडला नाही पाहीजे. अंधश्रद्धेच्या मार्गावर कधीही जायला नको. ज्ञानाचा पुरस्कार करायला हवा, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -