घरCORONA UPDATECoronavirus Live Update: राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ४९० वर, सर्वाधिक मृत्यू मुबंईत

Coronavirus Live Update: राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ४९० वर, सर्वाधिक मृत्यू मुबंईत

Subscribe

राज्यातील रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली. मुंबईत ४३ रुग्ण असून यात मुंबई परिसरातील १० रुग्णांचा समावेश आहे. या ४३ नव्या रुग्णांमुळे मुंबईतील आकडा २७८ वर पोहचला आहे. तसेच राज्यात ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये यात वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी १ रुग्ण असून, मुंबईतील २ रुग्ण आहेत.

- Advertisement -

 


कंटेनमेंट झोन जाहीर केलेल्या भागात १० ठिकाणी करोना तपासणी क्लिनीक उद्या पासून सुरू केले जाणार आहे. संशयित रूग्णांचे चाचणीसाठी नमुने घेण्याची सोयही यात राहणार आहे. हे क्लिनीक या भागात सकाळी ९ ते १ असे चा तासांसाठी सुरू राहील.

- Advertisement -

करोनाची लागण झालेले आणि ६० वर्षांवरील इतरही आजार असलेल्या रूग्णांची विशेष काळजी घेता यावी, यासाठी सर्व सोयी असलेल्या कस्तरबा, सेंट जार्ज, सेव्हन हिल्स, नानावटी आणि सैफी फक्त याच रूग्णालयात करोनाचे हे रूग्ण ठेवण्यात येतील. इतर रूग्णांच्या विलगीकरणासाठी वर दिलेली व्यवस्था वापरण्यात येईल. म्हणजे वरील रूग्णालये “कोरोना” रूग्णालये घोषित करण्यात आली आहेत.

bmc circular 1

 

bmc circular 2


गृहमंत्रालयाकडून राज्यांना ११ हजार ९२ कोटींची मदत जाहीर

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी ११ हजार ९२ कोटींची मदत जाहीर केली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी हा निधी दिला जात आहे.

 


बोरिवलीत पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. बोरीवली पश्चिम जुनी एम एच बी वसाहतीतील एका इमारतीत
३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. काल रात्री कोरोनाची लागण निष्पन्न झाल्याचे कळलं. महिलेला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवले. तसंच महिलेच्या पतीलाही भाभा रुग्णालयात हलवले आहे. त्यामुळे इमारत सील करण्यात आली आहे. कटुंबातील अन्य सदस्य आणि इमारतीतील रहिवाशी क्वारंटाईन झाले आहेत.


नाशिक जिल्ह्यामध्ये सहा कोरोनाचे संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही आहे. आम्ही जे काही नमुने धुळे शासकीय महाविद्यालयाकडे पाठवले होते. त्याचे अद्याप अहवाल आलेले नाही आहेत. कालचे जे नमुने आहेत. त्याचा कोणत्याप्रकारचा अहवाला प्राप्त झालेला नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी असल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही प्रकारचा अहवाल प्रशासनामार्फन कळवला जाईल. – डॉ. निखिल सददाणे, अतिरिक्त जिल्हा निरीक्षक


सध्या धारावीत कोरोनाच्या रुग्णाची संख्या हळूहळू वाढत आहे. धारावीत पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपायोजना केल्या जात आहे. काल धारावीत मेन रोडवरील जी-१४ अप्मेंटमध्ये ४८ फ्लॅट आणि ३ नर्सिंग होमला पालिकेने सील केलं.


CoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!


गोव्यात आणखीन एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांने मोझांबिक आणि केनियातून प्रवास केला आहे, अशी माहिती गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

 


यादरम्यान लॉकडाऊनचे पालन करा. सोशल डिस्टसिंगचा नियम तोडायचं नाही. – नरेंद्र मोदी


५ एप्रिल रविवारी रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करून घराच्या दरवाजात किंवा खिडकीमध्ये मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलचे फ्लॅश लाईट लावून ९ मिनिटं उभे राहा, असं आवाहन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Corona:५ एप्रिलला रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटं मला द्या! – पंतप्रधान नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊन दरम्यान प्रशासन आणि देशवासियांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासन आणि देशवासियांच कौतुक केलं.


१३० कोटी लोक एकत्र येऊन कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. तुम्ही एकटे नाही हे लक्षाच ठेवा. – मोदी


देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा विशेष संदेश देणार आहे. आज सकाळी ९ वाजता लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांना संदेश देणार आहेत. मोदी एक व्हिडिओ प्रसारीत करणार आहेत. अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे. आता देशवासियांना कोणता संदेश देणार याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.


जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाखांहून अधिक!

आतापर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाख २२ हजार १६३वर पोहोचली आहे. त्यापैकी ५३ हजार ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच २ लाख ९ हजार ८५२ कोरोनाग्रस्त रुग्ण रिकव्हर झाले आहेत. जगभरात सर्वाधिका कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले असून त्यापाठोपाठ इटली आणि स्पेन मध्ये आढळले आहेत.


 

 

 

 

 

 

 

 

आतापर्यंत देशभरातील कोरोनाची आकडेवारी

महाराष्ट्र – ४२३
तमिळनाडू – ३०९
दिल्ली – २९३
केरळ – २८६
तेलंगणा – १५४
आंध्रप्रदेश – १४९
राजस्थान – १३३
उत्तर प्रदेश – १२६
कर्नाटक – १२४
मध्यप्रदेश – १०७
गुजरात – ८८
जम्मू-काश्मीर – ७०
पश्चिम बंगाल – ५३
हरयाणा – ४९
पंजाब – ४७
बिहार – २९
चंदीगढ – १८
आसाम – १६
लडाख – १३
अंदमान-निकोबार – १०
उत्तराखंड – १०
छत्तीसगड – ९
हिमाचल प्रदेश – ६
गोवा – ५
ओडिसा – ५
पाँड्युचेरी – ५
झारखंड – २
मनिपुर – २
मिझोरमा – १
अरुणाचल प्रदेश – १
एकूण – २५४३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -