घरCORONA UPDATECoronaVirus Live Update - राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली!

CoronaVirus Live Update – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली!

Subscribe

आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे १४५ नवे आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६३५वर पोहोचली आहे. तसंच आतापर्यंत ५२ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मुंबई ३७७
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ८२
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा ७७
नागपूर, अहमदनगर प्रत्येकी १७
यवतमाळ ४
लातूर ८
बुलढाणा ५
सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद प्रत्येकी ३
कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशीम, अमरावती, हिंगोली प्रत्येकी १
इतर राज्य – गुजरात १
एक रुग्णाच्या पत्त्याची खातरजमा करण्यात येत आहे.

- Advertisement -

 


आज मुंबईतील गेल्या २४ तासात चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईत कोरोनाचे आज ५२ रुग्ण आढळले असून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ३३०वर पोहोचली आहे. तसंच मुंबईतील कोरोनाचे १४ रुग्ण बरे झाले आहेत.

CoronaVirus: मुंबईत गेल्या २४ तासात ५२ नवे रुग्ण, आकडा ३३०वर!

- Advertisement -


मुंबईची परिस्थिती चिंताजनक

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील धारावीमध्ये आता चौथा कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. धारावी येथील बलिगा नगरमध्ये हा रुग्ण आढळला आहे. धारावीतील ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता मुंबईतील सध्या परिस्थिती चिंताजनक होत आहे.

राज्यातील अपडेटेड आकडेवारी

मुंबई – ३०६
पुणे – ७३
सांगली – २५
ठाणे आणि एमएमआर – ७०
नागपूर – १६
अहमदनगर – २०
बुलढाणा – ५
यवतमाळ – ४
सातारा, औरंगाबाद प्रत्येकी – ३
कोल्हापूर, रत्नागिरी प्रत्येकी – २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद,
वाशिम, जळगाव,अमरावती प्रत्येकी – १
इतर राज्य-गुजरात – १
——————————————————-
एकूण ५३७


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकारपरिषद

गेल्या २४ तासात १२ रूग्णांचा मृत्यू. तर ६०१ रूग्णांची वाढ. देशातील कोरोना रूग्णांची संख्या २९०२ वर. ३३ टक्के रूग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील.


रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे, त्याप्रमाणे आहारात बदल करा – राजेश टोपे


केवळ रूग्णांची सेवा करणाऱ्यांना पीपीई किट्स आणि N95 मास्कची गरज, लवकरच डॉक्टरांना ट्रेनिंग देणार.


खासगी रूग्णालयातीस सेवा पुर्ण बंद ठेवणे अयोग्य – राजेश टोपे


काही प्रमाणात महाराष्ट्रात केसेस वाढत आहेत. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ५१ जण बरे होऊन घरी गेले. यात ज्येष्ठ नागरिक किंवा इतर व्याधी असलेल्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे’- मुख्यमंत्री

७ वर्षांच्या मुलीचा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतूक

धर्मा-धर्मात दुफळी माजवाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सज्जड दम!

मी कृपा करून, विनंती करतो, आवाहन करतो असं नेहमी म्हणतो ते संयमानं घरात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. त्या महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्यासाठी मी कोणतंही पाऊल उचलू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. जर कुणी याचा दुरुपयोग करून नोटांना थुंकी लावून पसरवणं, इशारे देणं असा प्रकार केला, तर तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही.


कालपर्यंत ७ लाख क्वींटल धान्याचं वाटप, लोकांनी अन्नधान्यासाठी घाबरण्याची गरज नाही – छगन भुजबळ


गेल्या १२ तासात मुंबईत २८ तर, ठाण्यात १२ नवे रूग्ण


लोकांनी घरातून बाहेर पडू नका, पोलिसांवरील ताण वाढवू नका – राज ठाकरे


मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो तुम्हाला कडक पावले उचलली पाहिजे आणि याचा संदेश सगळीकडे पोहोचायला हवा. लॉक डाऊनचे दिवस देखील वाढतील त्याचा परिणाम सगळ्याच गोष्टीवर होणार. या आजारावर औषध नाही आपल्याकडे व्हेंटिलेटर नाहीत. – राज ठाकरे


कोरोना पसरवणाऱ्यांना गोळा घाला, काळा बाजार करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे – राज ठाकरे


पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत कशी होते, वसईतील कार्यक्रम रद्द केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. पोलिसांवर हात उचलणाऱ्याना फोडून काढणारे व्हीडिओ बाहेर आले पाहिजेत – राज ठाकरे


दिल्लीला जो प्रकार घडला त्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. याना देशापेक्षा धर्म मोठा वाजत असेल तर या लोकांना फोडून काढले पाहिजे. या लोकांना फोडून काढण्याचे व्हीडिओ आता व्हायरल झाले पाहिजे. लॉक डाऊन थोड्या दिवसासाठी आहे नंतर आम्ही आहोतच, तबलिगी मर्कतवर राज ठाकरेंची टीका


मोदींच्या भाषेत आशेचा किरण दिसायला हवा होता, लोकांमधील संभ्रम दूर करायला हवा होता. – राज ठाकरे


लॉकडाऊनचे दिवस वाढले तर मोठा परिणाम राज्यावर होईल, आर्थिक संकट राज्यावर येईल- राज ठाकरे


नागरिकांनी हा लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा – राज ठाकरे


सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.


२ एप्रिलपासून जिल्हा रूग्णालयात भरती असलेला अमरावतीच्या ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण या इसमाला झाली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीच्या श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यामुळे त्याला इर्विन रुग्णालयात दाखल केले होते.  मृत्यूनंतर त्याचा स्वॅब चाचणीचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला आहे.


 

काल दिवसभरात देशात ५०० पेक्षा रूग्णांची वाढ.. देशात कोनाग्रस्तांचा आकडा ३ हजाराहून अधिक. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली. मुंबईत ४३ रुग्ण असून यात मुंबई परिसरातील १० रुग्णांचा समावेश आहे. या ४३ नव्या रुग्णांमुळे मुंबईतील आकडा २७८ वर पोहचला आहे. तसेच राज्यात ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये यात वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी १ रुग्ण असून, मुंबईतील २ रुग्ण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -