घरदेश-विदेशकोरोनावर आता 'या' 2 अँटीबॉडी औषधांची गरज नाही; WHO ची नवी माहिती

कोरोनावर आता ‘या’ 2 अँटीबॉडी औषधांची गरज नाही; WHO ची नवी माहिती

Subscribe

जगभरात गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने थैमान घातले, अद्यापही अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहे. मात्र मागील दोन वर्षांच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग आणि धोका आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान या व्हायरसच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर इलाज म्हणून वापरल्या जाणाऱ्या दोन अँटीबॉडी औषधांबाबत आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना रुग्णांसाठी प्रभावी मानल्या गेलेल्या दोन मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधांच्या वापराबाबत नवा सल्ला दिला आहे.

सुधारित उपचार मार्गदर्शन तत्वांमध्ये WHO ने कोरोना रूग्णांसाठी दोन वापरली जाणारे अँटीबॉडी औषधे सोट्रोविमाब आणि कॅसिरिव्हिमॅब-इमडिविमॅब न वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ही दोन्ही औषधे सध्या ओमिक्रॉनसारख्या व्हेरियंटविरूद्ध अप्रभावी ठरू शकतात असेही WHO ने म्हटले आहे.

- Advertisement -

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, कोरोनाच्या उपचारांसाठी सोट्रोविमाब आणि कॅसिरिव्हिमॅब-इमडिविमॅब नावाची दोन अँटीबॉडी औषधांना मंजूरी देण्यात आली होती. डब्ल्यूएचओनेच गेल्या वर्षी काही कोरोना रुग्णांसाठी या दोन अँटीबॉडी औषधांची शिफारस केली होती. मात्र आता WHO गाईडलाईन्स डेव्हलपमेंट ग्रुप ऑफ इंटरनॅशनल एक्सपार्ट्स टीमच्या रिव्हूमुळे या दोन अँटीबॉडी औषधांचा वापर थांबवण्याची शिफारस करण्यात आली. हा रिव्ह्यू रिपोर्ट जर्नल बीएमजेमध्ये शुक्रवारी प्रकाशित झाला आहे.

ही औषधे SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनला थांबवण्याचे काम करते. जी पेशींना संक्रमित करण्याची व्हायरची क्षमता तटस्थ करते. दोन्ही औषधांना यूएस एफडीएने कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. कारण यापूर्वीच्या चाचण्यांमध्ये या दोन्ही औषधांचा कोरोना व्हेरियंटच्या डेल्टा व्हेरियंटवर काही परिणाम दिसून आला होता. पण आता ताज्या संशोधनात या दोन औषधांचा परिणामकारक विचार झालेला नाही. तज्ञांच्या माहितीनुसार, सर्व चाचण्या आणि पुरावे तपासल्यानंतर पॅनेलने निर्णय घेतला की जवळजवळ सर्व रुग्णांवरील सोट्रोविमाब आणि कॅसिरिव्हिमॅब-इमडिविमॅब या औषधांचा वापर थांबवावा.

- Advertisement -

कोविड-19 ग्रस्त रुग्णांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडी औषध कॅसिरिविमाब-इमडिव्हिमॅबच्या वापराविरूद्ध जोरदार शिफारस करत तज्ञांनी विट्रो (लॅब-आधारित) न्यूट्रलायझेशन डेटाचा विचार केला. तज्ञांनी सांगितले की, क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, अँटीबॉडी औषधे सोट्रोविमॅब आणि कॅसिरिव्हिमाब-इमडिव्हिमॅब यांनी SARS-CoV-2 आणि त्याच्या विविध व्हेरियंटवरविरोधात आपली परिणामकारता दाखवणे कमी केले आहे. म्हणजेच, ही दोन्ही औषधे कोरोनाच्या व्हेरियंटविरोधात लढण्यासाठी तितकीशी प्रभावी सिद्ध होत नाहीत. दरम्यान या मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधांची परिणाम कारकता कमी झाल्याचे पॅनेलने मान्य केले आहे.


छोट्या पक्षांचा मोठा अहंकार एकजुटीतील अडथळा!

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -