घरCORONA UPDATEलस आली तरी लसीकरण अवघड; २५ कोटी डोस द्यावे लागणार - मुख्यमंत्री

लस आली तरी लसीकरण अवघड; २५ कोटी डोस द्यावे लागणार – मुख्यमंत्री

Subscribe

कोरोनाची लस येणार असे बोलले जाते. मात्र लस नक्की कधी येणार? हे माहीत नाही. तसेच लस आल्यानंतर ती कशी द्यायची, हे देखील ठरलेले नाही. सर्वांना एकत्रित लस देणे अवघड आहे. सर्वांना एकत्रित लस देता येणार नाही. कारण
राज्याची लोकसंख्या १२ कोटी आहे. जी लस येईल ती १२ कोटी जनतेला दिल्यानंतर त्याचा पुन्हा एक बुस्टर डोस द्यावा लागणार आहे. म्हणजेच राज्यासाठी २५ कोटी लसींची गरज लागणार आहे. एवढ्या प्रमाणात लसीकरण हे लवकर होणार नाही. त्यामुळे जनतेने कोरोनापासून बचाव करण्याचे जे मार्ग आहेत, त्याचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग ज्यांना होऊन गेला आहे, “त्यांच्यामध्ये पोस्ट कोविड हा चिंता वाढविणारा विषय आहे. कोरोनानंतर श्वसनसंस्था, मेंदू यावर वाईट परिणाम झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. जर एवढे
दुष्परिणाम होत असतील तर आपण धोका का पत्करायचा? विरोधक हे उघडा, ते उघडा असे सांगतायत. मी सगळे उघडे करायला तयार आहे. पण त्यांची जबाबदारी कोण घेणार? जबाबदारी माझीच आहे. म्हणून मी योग्य वेळी सर्वकाही उघडण्याचा निर्णय घेईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -