घरताज्या घडामोडीनाशिकचे ३४ नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; काय रणनीती आखणार?

नाशिकचे ३४ नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; काय रणनीती आखणार?

Subscribe

एकीकडे पक्षातील निष्ठावान शिवसैनिक शिंदे गटात सामील होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याकरता नाशिक आणि मालेगावमधील नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ३४ नगरसेवक मातोश्रीत दाखल झाले असून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. यावेळी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मातोश्रीचा परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत असं प्रतिज्ञापत्र ही देणार आहोत. कितीही आमदार खासदार फुटू देत आम्ही मालेगावचे पदाधिकारी, नगरसेवक उद्धव साहेबांसोबतच आहोत असं नगरसेवक राजाराम जाधव यांनी सांगितले आहे. (Corporator from Nashik meet today to Shivsena Chief Uddhav Thackeray)

हेही वाचा – पक्षाची काय अवस्था करून टाकलीय, संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे; फडणवीसांचा टोला

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला खिंडार पडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर अविश्वास दाखवून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेना सोडली. तसेच, त्यांच्या पाठोपाठ खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, अनेक नगरसेवकांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात सामील होतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, नाशिकच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत याचा शिवसेनेला फायदा होईल.

हेही वाचा मला राजकारण सोडावं वाटतं, कारण…, सत्ताकारणावरून नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

- Advertisement -

शिवसेनेला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सज्ज झाले आहेत. आदित्य ठाकरे राज्यभर दौरे घेत असून उद्धव ठाकरे देखील लवकरच राज्याचा दौरा करणार आहेत. यासाठी बैठकांना सुरुवात झाली असून नियोजन सुरू करण्यात आले आहे. तर, आदित्य ठाकरे यानी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत वेगळं चित्र दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, ठाकरे पिता-पुत्र आता अॅक्शन मोडमध्ये आल्याने शिवसेना कात टाकणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -