घरमहाराष्ट्रनाशिकमहापौरांच्या पहिल्याच सभेत निषेधाच्या घोषणा; महासभा तहकूब

महापौरांच्या पहिल्याच सभेत निषेधाच्या घोषणा; महासभा तहकूब

Subscribe

विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागरिकत्व विधेयकाला विरोध करत घोषणा केल्यामुळे महापौरांनी महासभा २० मिनिटांसाठी तहकूब केली.

नाशिकचे भूमीपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत राहुल गांधी यांचा निषेध केला. तसा ठरावही मंजूर केला. याचवेळी विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागरिकत्व विधेयकाला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचाही घोषणा देत निषेध केला. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण झाले होते. तर सत्ताधारी भाजप आणि विरोधक समोरासमोर उभे ठाकल्याने घोषणाबाजीला अधिक जोर आला. अखेर महापौरांनी महासभा २० मिनिटांसाठी तहकूब केली.

दिवे यांनी हातात चप्पल घेत केला निषेध

या दरम्यानही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. काँग्रेसचे नगरसेवक राहुल दिवे यांनी हातात चप्पल घेत निषेध नोंदवल्याने स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी त्यांना अक्षरशः उचलून घेत बाजूला नेले. मात्र, तरीही दिवेंची घोषणाबाजी थांबली नाही. दुसरीकडे अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध करीत घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, काँग्रेस गटनेते शाहू खैरे आदींसह संबंधित पक्षाच्या नगरसेवकांनी सहभाग घेतला. महत्वाचे म्हणजे भाजपचे महापौर सतीश कुलकर्णी आणि उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या कारकीर्दीतील ही पहिलीच सभा आहे. या सभेची सुरुवातच निषेधाच्या घोषणांनी झाली.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे? त्या घटनेमुळे मंत्रिपद हुकणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -