घरमहाराष्ट्रभ्रष्टाचार प्रकरण : परिवहन आयुक्तांचा क्राईम ब्रँचने नोंदवला जबाब

भ्रष्टाचार प्रकरण : परिवहन आयुक्तांचा क्राईम ब्रँचने नोंदवला जबाब

Subscribe

'आरटीओ' भ्रष्टाचारप्रकरणी क्राईम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ढाकणे यांच्याशी

राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या परिवहन विभागातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे शनिवारी (दि.२९) नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी तपासी अधिकारी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांची भेट घेतल्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला.

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) गैरकारभारासह कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचे गंभीर आरोप याच विभागातील मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलिसांत लेखी तक्रार अर्जाद्वारे केले आहेत. यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह सहा बड्या अधिकाऱ्यांची नावे पाटील यांनी तक्रारीत दिली असून, त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी चौकशी सुरू केली असून, तब्बल नऊ अधिकारी आणि तीन खासगी व्यक्तींना चौकशीसाठी नोटिसीद्वारे हजर राहण्याची सूचना केली आहे.

- Advertisement -

या चौकशीचाच एक भाग म्हणून राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे शनिवारी तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले. पंचवटीच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षकांनी या प्रकरणातील सर्व कागदपत्रे यादीसह क्राइम ब्रँचचे पोलीस उपायुक्त बारकुंड यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर क्राईम ब्रँचने संबंधितांना नोटीसा दिल्यानंतर लगेचच राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे नाशिकला दाखल झाले. त्यामुळे परिवहन विभागाच्या मंत्र्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांवर चौकशीला प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत.

शनिवारी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची चौकशी झाली असून जबाब घेण्यात आला आहे. तक्रारदार गजेंद्र पाटीलसह इतरांचे जबाब घेतले जाणार आहेत. त्यानंतर चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे सादर केला जाणार आहे. – संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -