घरCORONA UPDATEकल्याणमध्ये शिधा वाटपात भ्रष्टाचार? २५ किलो ऐवजी १० किलोचे वितरण 

कल्याणमध्ये शिधा वाटपात भ्रष्टाचार? २५ किलो ऐवजी १० किलोचे वितरण 

Subscribe

रेशनिंग दुकानदारांकडून २५ किलो धान्याऐवजी १० किलो धान्य दिले जात आहे. त्यामुळे धान्य वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने या काळात गोरगरीबांना २५ किलो मोफत धान्य वाटप करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र व राज्य सरकारला दिले आहेत. मात्र, रेशनिंग दुकानदारांकडून २५ किलो धान्याऐवजी १० किलो धान्य दिले जात आहे. त्यामुळे धान्य वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला असून लुटमार करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. नियमानुसार धान्य वितरीत न करणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिधावाटप अधिकारी एकनाथ पवार यांनी दिले आहे.
रेशनिंग दुकानातून देण्यात येणाऱ्या २५ किलो धान्याऐवजी १० किलो धान्य मिळाले असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. तसेच अटाळी गावात एका नगरसेवकाच्या नातेवाईकाला रेशनकार्डचे धान्य देण्यास नकार देण्यात आला होत या संदर्भात त्यांनी आवाज उठवला. त्यावेळी त्याला धान्य देण्यात आले केंद्राचे आदेश असतानाही त्याची योग्य पध्दतीने अमंलबजावणी होत नसल्याचे यावरून दिसून आल्याचे पवार यांनी सांगितले. त्या तक्रारीनुसार खातरजमा करण्यासाठी पवार यांनी कल्याणातील काही रेशनिंग दुकानदारांची भेट घेतली. तसेच लाभार्थी ग्राहकांशी चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी कल्याणचे शिधावाटप अधिकारी एकनाथ पाटील यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
त्यावेळी शिधावाटप अधिकाऱ्यांनीही तक्रारीची दखल घेत नियमानुसारच धान्य वितरीत केले पाहिजे. तसे होत नसेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी पवार यांना सांगितले. धान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना वितरीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे  १ मेपासून केशरी कार्ड धारकांना धान्य मिळण्याचे नियोजन सुरू आहे असे शिधावाटप अधिकारी एकनाथ पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -