घरमहाराष्ट्रखुशखबर : Costal Road Toll Free; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

खुशखबर : Costal Road Toll Free; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

 

मुंबईः Costal Road Toll Free असेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. गिरगाव चौपाटी येथील Costal Road च्या दुसऱ्या भोगद्याचे काम झाले. तेथे मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

गिरगाव चौपाटी येथील Costal Road च्या दुसऱ्या भोगद्याचे काम मंगळवारी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना Costal Road ची माहिती दिली.

- Advertisement -

सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा Costal Road असणार आहे. मुंबईकरांना सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. Costal Road मुळे वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. आज Costal Road च्या दुसऱ्या भोगद्याचे काम झाले. हा भोगदा फायर प्रुफ आहे. आग लागली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हा बोगदा करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र सरकार आपल्याला सदैवच मदत करत असते.  Costal Road च्या दोन खांबातील अंतर वाढवण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली होती. यात काही अडथळे होते. केंद्र सरकारने हे अडथळे दूर केले. मुंबईत देशविदेशातील पर्यटक येतात. पर्यटकांना आकर्षित करणारा असा मुंबईचा चेहरा असायला हवा. त्यानुसारच सद्या मुंबईचे सुशोभिकरण सुरु आहे.

Costal Road दहिसर, भाईंदरपर्यंत जाणार आहे. मुख्य Costal Road चे काम नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. पुढील Costal Road चे काम त्यानंतर सहा महिन्यात होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Costal Road ला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

Costal Road ला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केली. छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा  Costal Road परिसरात उभारला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रवासाची आणि इंधनाची बचत

शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा असणाऱ्या Costal Road मुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्‍क्‍यांची बचत होण्यासोबतच ३० टक्के इंधन बचत देखील साध्य होणार आहे. यामुळे अर्थातच पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे.

जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान

Costal Road साठी उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात Costal Road चे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७० ते ७५ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे.

भूमिगत वाहनतळ

Costal Road जवळील धार्मिक व पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन, या स्थळांच्या जवळच्या परिसरात ३ मोठी भूमीगत वाहनतळे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी एक वाहनतळ हे महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्या जवळ असणार आहे. दुसरे वाहनतळ हे ‘अमर सन्स गार्डन’ जवळ असणार आहे. तर मोठ्या प्रमाणात शालेय सहली येणा-या वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ८५६ एवढी असणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाहनतळ भूमीगत असणार आहे.

 

असे होणार बोगद्याचे काम

• बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.
• प्रकल्पातील बोगद्याला ३७५ मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था. यामध्ये भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था.
• दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी.
• प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल से वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.
• पर्यावरणपूरक पद्धतीनं काम. प्रवाळ (Coral)स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याची कार्यवाही यशस्वी.
• ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत. अतिरिक्त जवळजवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -