घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023कापूस उत्पादकांना खूशखबर; अमरावतीत मेगा टेक्सटाईल पार्कला मंजूरी, फडणवीसांची माहिती

कापूस उत्पादकांना खूशखबर; अमरावतीत मेगा टेक्सटाईल पार्कला मंजूरी, फडणवीसांची माहिती

Subscribe

 

मुंबईः कापूस उत्पादकांसाठी अमरावतीत मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. याचा फायदा कापूस उत्पादकांना नक्कीच होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

- Advertisement -

विधि मंडळाच्या आवारात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अमरावतीत मेगा टेक्सटाईल उभारल्याने त्याचा लाभ कापूस उद्योगाला होणार आहे. यामुळे दहा हजार कोटींची थेट गुंतवणूक येणार आहे. एक लाख डायरेक्ट आणि दोन लाख इनडायरेक्ट नोकऱ्या उपलब्ध मिळणार आहेत. कापूस उत्पादकांची अर्थव्यवस्था बदलणार आहे. या पार्कला मंजूरी दिल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.

- Advertisement -

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या फसवणुकीचा मुद्दाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला.  फडणवीस यांनी या फसवणुकीची माहिती प्रसार माध्यमांना दिली. हा कोणता राजकीय कट आहे की नाही, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, असं देखील यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच या प्रकरणात अनिक्षाकडून खूप काही गोष्टी रेकॉर्डवर आल्या आहेत. यात मुंबईच्या एका माजी पोलीस आयुक्ताचं देखील नाव घेतल्याचा खुलासा फडणवीसांनी केलाय. या प्रकरणात काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचीही नावं घेतली गेली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. सर्व गोष्टींचा खुलासा होईल. जेव्हा या प्रकरणात पुरावे समोर येतील तेव्हा मी नाव जरूर घेईल, असा इशारा फडणवीसांनी दिला.

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच दिल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती महाराष्ट्रभर पसरताच उल्हासनगरहून पोलिसांनी अनिक्षा जयसिघांनी हिला अटक केली. यावेळी तिचा भाऊ रुग्णालयात दाखल होता. तर, वडील अनिल जयसिंघानी अद्यापही फरार आहे. अनिल जयसिंघानी हा कुप्रिसद्ध बुकी असून गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो फरार आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याची अधिक चौकशी करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -