घरमहाराष्ट्रधक्कादायक! रुग्णाला दिलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे

धक्कादायक! रुग्णाला दिलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे

Subscribe

पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या सूपमध्ये रक्ताचे बोळे आढळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

रुग्णाला दिलेल्या पूपमध्ये चक्क रक्ताने माकलेल्या कापसाचा बोळा सापडल्याचे एकच खलबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घडल्याचे समोर आले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी याचा व्हिडिओ बनवत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात २९ एप्रिल रोजी महेश सातपुते यांची पत्नी प्रसूतीसाठी दाखल झाली होती. त्याच संध्याकाळी त्यांना मुलगी झाली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सूप देण्यात आले होते. मात्र, या सुपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे दोन बोळे सापडून एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रुग्णालयाकडून याप्रकरणी अद्याप कोणतही स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही. सूपमध्ये रक्ताने माकलेले कापसाचे बोळे असल्याचे पाहिल्यावर रुग्णाला मोठा धक्का बसला आहे. रुग्णाचा पती महेश सातपुते यांनी या घटनेचा व्हिडिओ काढून कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दाखल केली. या घडल्या प्रकारानंतर जहांगीर रुग्णालय प्रशासनाने या घटनेशी संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -