मा. नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात; महानगरप्रमुख होण्याची शक्यता

नाशिक : राज्यात शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे यांनी ४०आमदारांनाच्या साथीने भाजपा सोबत सरकार स्थापन केल. त्यानंतर राज्यातील एकूणच राजकीय समीकरण बदलली. आमदारांच्या पाठोपाठ १२ खासदारांनीही शिंदे यांच्यासोबत जात लोकसभेत वेगळा गट निर्माण केला. त्यानंतर राज्यभरात विविध नेते, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शिंदे गटसोबत जाण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्येही दादा भुसे, सुहास कांदे यांच्या पाठोपाठ खासदार हेमंत गोडसे यांनीही शिंदे गटाची वाट धरली. त्यांच्यासोबतच संघटनेतील अनेक पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनीही शिंदे गटात जाण्याचं निर्णय घेतला. अस असलं तरी नाशिक शहरातून मात्र कुठलाही पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा जोपासल्याच चित्र होत. मात्र आता माजी विधानसभा प्रमुख तथा म्युनसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष, मा. नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. शहरातून तिदमे यांच्या रूपाने शिंदे गटात पहिलाच मोठा प्रवेश मानला जात आहे. तिदमे यांना शिंदे गटाचे महानगरप्रमुख म्हणूनही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

चिन्हाची बघताय वाट 

शहरातील शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक तसेच इच्छुक येत्या महानगरपालिकेच्या दृष्टीकोणातून तयारीला लागले आहेत. मात्र राज्यात झालेल सत्तांतर तसेच शिवसेनेत झालेल बंड यापार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये मोठी संभ्रमाची स्थिति आहे. अश्या परिस्थितीत जर महानगरपालिका निवडणुकाना सामोरं जायच असेलच तर ज्या गटाकडे धनुष्यबाण चिन्ह जाईल त्या गटसोबत जाण्याची भूमिका अनेक जण खासगीत बोलून दाखवत आहेत.