घरCORONA UPDATECoronavirus : झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयांच्या निर्जंतुकीकरणावर नगरसेवकांचा भर!

Coronavirus : झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयांच्या निर्जंतुकीकरणावर नगरसेवकांचा भर!

Subscribe

मुंबईतील रुग्णालयांसह कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या ठिकाणीचे जंतूनाशकाची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर महापालिकेने हाती घेतली आहे.

मुंबईतील रुग्णालयांसह कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या ठिकाणीचे जंतूनाशकाची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर महापालिकेने हाती घेतली आहे. मात्र, मुंबईतील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता, या विषाणूचा संसर्ग झोपडपट्टयांमध्ये झाल्यास हा आलेख झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांना प्रथम लक्ष्य करणे आणि तोच परिसर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.  कारण सार्वजनिक शौचालयांच्या माध्यमातून संसर्ग अधिक होण्याची भीती असल्यामुळे महापालिकेच्या यंत्रणांची वाट न पाहता खुद्द नगरसेवकांनी पुढाकार घेत झोपडपट्टी परिसरांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये जंतूनाशकाची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने अग्निशमन दल आणि किटक नाशक विभागाचे कर्मचारी आदींच्या मदतीने मुंबईतील रुग्णालय, तसेच इतर भागातील निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यात येत आहे.  मात्र, झोपडपट्टी परिसरात या विषाणूचा संसर्ग झाल्यास मोठे संकट निर्माण होईल, या भीतीनेच सर्व नगरसेवकांनी झोपडपट्टी परिसराकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण हे महत्वाचे असल्यामुळे नगरसेवकांच्या माध्यमातून शौचालयांमध्ये जंतूनाशक फवारणी केली जाते आहे.

- Advertisement -

दहिसर पूर्व येथील रावळपाडा, परिसरातील प्रभाग क्रमांक ४ च्या शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर, कांदिवलीतील प्रभाग क्रमांक २४च्या भाजप नगरसेविका सुनीता यादव, कांदिवलीतील पोयसर  भाजप नगरेसवक शिवकुमार झा, गोरेगाव आरे कॉलनी परिसरातील भाजप नगरसेविका प्रिती सातम, कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका सुरेखा पाटील, दहिसरच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, दादरमधील शिवसेना नगरसेविका प्रिती पाटणकर, शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर, शिवडी येथील शिवसेना नगरसेविका श्रध्दा जाधव, भांडुपमधील भाजप नगरसेविका सारीका पवार आदी नगरसेवकांनी आपापल्या विभागातील झोपडपट्टी तसेच चाळीतील सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करून घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -