घरमहाराष्ट्रदेशाच्या नागरिकांची 'मन की बात' कर्नाटकातून स्पष्ट; राऊतांचा मोदींना टोला

देशाच्या नागरिकांची ‘मन की बात’ कर्नाटकातून स्पष्ट; राऊतांचा मोदींना टोला

Subscribe

राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचाच हा पराभव असल्याचं राऊत म्हणाले. कर्नाटकात काँग्रेसला पूर्ण बहूमत आहे, त्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. तसंचं, देशाच्या मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली आहे, असं म्हणत राऊतांनी मोदींना टोला लगावला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज, 13 मे रोजी निकाल लागणार आहे. सध्या कल हाती येत आहेत. समोर आलेल्या कलांनुसार, काँग्रेसने मुसंडी मारल्याचं दिसत आहे, तर भाजप मात्र पिछाडीवर आहे. यावरच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचाच हा पराभव असल्याचं राऊत म्हणाले. कर्नाटकात काँग्रेसला पूर्ण बहूमत आहे, त्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. तसंचं, देशाच्या मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली आहे, असं म्हणत राऊतांनी मोदींना टोला लगावला. ( mCountry s Mann Ki Baat clear from Karnataka Sanjay Raut Critisized Pm Narendra Modi )

कर्नाटकातील काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून पतंप्रधान नरेंद्र मोदीं, गृहमंत्री अमित शाह यांनी  हा पराभव स्वीकारला पाहिजे. कारण, या प्रमुख दोन नेत्यांनी कर्नाटकात तंबू ठोकला होता. म्हणजेच, कर्नाटकच्या जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारलं आहे, हे मान्य करा, असं आव्हान त्यांनी मोदी-शाहांना दिलं आहे.

- Advertisement -

फडणवीस-शिंदेंना टोला 

कर्नाटकाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून काही  लोक प्रचारासाठी गेले. त्यांनी जिथे प्रचार केला तिथे भाजपचा दारुण पराभव झाला. कर्नाटकाचा निकाल हा 2024 साठी विरोधी पक्षाच्या आघाडीचा सत्तेचा दरवाजा उघडणारा  असेल, 2024 साली देखील असेच निकाल लागतील, असं राऊत म्हणाले. तसचं, ही एक लोकभावना आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली आहे, असं म्हणत राऊतांनी मोदींना टोला लगावला आहे. तसंच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस यांनी पैशांचा महापूर आणला होता, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे.

( हेही वाचा: Live Karnataka Election Result : अथणी मतदारसंघात काँग्रेसचे लक्ष्मण सवदी आघाडीवर )

कर्नाटकची जनता दबावाला बळी पडली नाही

भाजपच्या टोळ्या कर्नाटकात गेल्या होत्या. जनतेवर दबाव टाकला गेला. खोके वाटप झालं. परंतु, कर्नाटकची जनता मात्र या दबावाला बळी पडली नाही. भाजपचा जरी पराभव झाला असला तरी काही तोडफोड करुन सत्ता स्थापन करता येईल का? असा भाजप प्रयत्न करत असल्याचं म्हणत राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
कर्नाटकात कोणतीही स्टोरी चालली नाही फक्त जनतेची स्टोरी चालली आणि हनुमानाची गदा तर भाजपच्याच डोक्यावर पडल्याचं दिसून येत असल्याचंही राऊत म्हणाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -