घरट्रेंडिंगCoronavirus: कोल्हापूरमध्ये दुचाकीवरून जाणारा शिंकला म्हणून लोकांनी फटकावले!

Coronavirus: कोल्हापूरमध्ये दुचाकीवरून जाणारा शिंकला म्हणून लोकांनी फटकावले!

Subscribe

चीनमधून भारतात आलेल्या करोनाची दहशत सर्वसामान्यात बसली आहे. कारण महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४७ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर मुंबईत करोनामुळे एकाचा बळी घेतला आहे. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोल्हापुरात शिंकल्यावरुन एका दुचाकीस्वाराला दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घटना कोल्हापुरातील गुजरी गल्लीत घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोल्हापूरात गुजरी गल्लीत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्य दुचाकीवरुन जात होतं. त्यांच्या शेजारुन जाणारा दुचाकीस्वाराला अचानक शिंक आली. त्यानंतर शिंकलास का? मास्क का नाही लावलं असं म्हणत दाम्पत्याने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

- Advertisement -

राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संऱ्या ४०च्या वर गेल्यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता राज्य सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये, राज्यातली सरकारी कार्यालयं निम्म्या क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाचा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये धिम्या गतीने प्रसार होत आहे. मात्र, तो वाढू नये, यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. त्यामध्ये गर्दी होणाऱ्या बाजारपेठा रोटेशन पद्धतीने म्हणजेच आलटून-पालटून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी विभागीय आयुक्तांना आपापल्या वॉर्डामधल्या अशा बाजारपेठांची यादी आणि त्या कधी बंद ठेवता येतील, याचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. रस्त्यांनुसार त्यावरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दादर, माहीम आणि धारावी या परिसरात कोणती दुकानं आणि कार्यालयं कधी बंद राहतील आणि कधी खुली राहतील, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मुंबईकरांनो ‘ही’ जबाबदारी आपलीच ना ?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -