घरताज्या घडामोडीमुंबई - गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामावर कोर्ट कमिशनचे ताशेरे

मुंबई – गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामावर कोर्ट कमिशनचे ताशेरे

Subscribe

महामार्ग ड्रॉईंग आणि नकाशाप्रमाणे बनवला नसून अनेक ठिकाणी बाह्यमार्ग दिशादर्शक फलकही नाहीत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही.

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर अलिबाग कोर्ट कमिशनने ताशेरे ओढले आहेत. कोर्ट कमिशनने महामार्गाच्या पळस्पे ते पोलादपूर या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावर सलग ५ किलोमीटर रस्ताही सुस्थितीत नाही. तर अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणही निकृष्ट असल्याचे कोर्ट कमिशनने म्हटले आहे.

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तब्बल १० वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. या महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी अलिबाग दिवाणी न्यायालयाने कोर्ट कमीशनची नियुक्ती केली. कोर्ट कमीशनने मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते पोलादपूर या १४० किलोटमीर रस्त्याची पाहणी केली. या १४० किलोमीटर रस्त्यापैकी अवघा ५ किलोमीटर रस्ताही चांगला नसून महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याचे ताशेरे कोर्ट कमीशनने ओढले आहेत.

- Advertisement -

महामार्ग ड्रॉईंग आणि नकाशाप्रमाणे बनवला नसून अनेक ठिकाणी बाह्यमार्ग दिशादर्शक फलकही नाहीत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता तुंबण्याची शक्यता आहे. महामार्गावर जेवढे काँक्रिटीकरण झाले ते ही निकृष्ट आहे असे सांगत कोर्ट कमिशनने या महामार्गाच्या थर्ड पार्टी ऑडिटची गरज व्यक्त केली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -