Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे सासू-सासऱ्यांचा छळ करणाऱ्या सुनेला 15 दिवसांत बंगला खाली करण्याचा न्यायालयाचा आदेश

सासू-सासऱ्यांचा छळ करणाऱ्या सुनेला 15 दिवसांत बंगला खाली करण्याचा न्यायालयाचा आदेश

Subscribe

पुणे : सासू-सासऱ्यांचा बंगला 15 दिवसांत रिकामा करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांच्या न्यायालयाने सुनेला दिले आहेत. पुण्यातील एका डॉक्टर सुनेने तिचा पती, सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत न्यायालयात दावा केला होता. सूनेने न्यायालयाने ऑगस्ट 2021 मध्ये न्यायालयात हा दावा केला होता. न्यायालयाने सुनेने सासू-सासरे यांच्याकडे बंगल्यातील एक खोली राहण्यासाठी देण्याचा निर्णय दिला होता.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सून बंगल्यामध्ये खोलीत राहत होती आणि सूनेच्या पोटगीचा दावा प्रलंबित होता. या महिलेचा पती जानेवारी 2022 पासून अमेरिकेत वास्तव्यात आहे. या पती-पत्नींना मूले नाहीत. या बंगल्यात सासू-सासरे आणि सून असे तीन लोक राहत आहेत. सासू-सासरे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना त्रास देऊ नका, असे आदेशही न्यायालयाने 2022 मध्ये आदेश दिला होता.

सासू-सासऱ्यांचा सूनविरोधात न्यायालयात अर्ज

- Advertisement -

यानंतर सुनेने तिच्या सासू-सासऱ्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला. यानंतर महिलेच्या सासू-सासऱ्यांनी न्यायालयात सूनविरोधात अर्ज दाखल केला. या अर्जात सासू-सासऱ्यांनी सूनेकडून त्रास होत असून बंगल्यात राहण्याचा न्यायालयाचा निर्णय बदलण्याची मागणी केली होती.

हेही वाचा – “लोकांमधला राग मतपेटीत उतरला पाहिजे”, खड्ड्यांच्या मुद्यांवर राज ठाकरेंची आक्रमक भूमिका

सुनेला मिळणार घरभाड

- Advertisement -

पतीने पत्नीला भाडेतत्वावर घर देण्याचे टरविल्याने न्यायालयाने सुनेला सासू-सासऱ्यांचे घर हे 15 दिवसांत खाली करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सूनेला बंगला सोडण्याचा आदेश दिले. त्यासोबत सूनेच्या घरभाड्याची देण्याची तरदूत निकाल देताना केली आहे. पतीने त्याच्या पत्नींला दरमहा 25 हजार रुपये घरभाडे द्यावे, असे निकाला नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -