मलिकांचे आरोप चुकीचे असतील तर खरी कागदपत्र सादर करा, कोर्टाचे वानखेडेंच्या वडिलांना आदेश

Court orders Wankhede's father to file original documents if Malik's allegations are false

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात हायकोर्टात सुनावणी करण्यात आली आहे. कोर्टाने दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नवाब मलिकांचे आरोप चुकीचे असतील तर खरी कागदपत्र दाखवून सिद्ध करा असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी १.२५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विट करत अनेक आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपांविरोधात ज्ञानदेव वानखेडे मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. याबाबत हायकोर्टात सुनावणी झाली आहे. वानखेडेंच्या याचिकेचा नवाब मलिकांनी विरोध केला आहे.

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक हे एक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी केलेली वक्तव्ये चुकीची आहेत हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. तर आपण खरं बोलत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे मलिकांचे आरोप खोटे असतील तर तुम्ही खरी कागदपत्र दाखवून सिद्ध करा असे कोर्टाने म्हटलं आहे. यावर नवाब मलिकांचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी थोडा अवधी देण्याची मागणी वानखेडेंकडून करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचारी असल्यामुळे आरोप होणारच

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक आरोप करण्यात येत आहेत. याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचे वानखेडेंच्या वडिलांकडून सांगण्यात आले. समीर वानखेडेंसोबत वाद सुरु असताना त्यांची बहीण, मेहुणी यांच्यावर आरोप करण्याचे कारण काय? असा सवाल वानखेडेंकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर कोर्टाने उत्तर दिलं आहे की, समीर वानखेडे हे सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर आरोप होणार तुम्ही केवळ मलिकांचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करा.


हेही वाचा : माझं ट्विट आणि शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी; नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया