जितेंद्र आव्हाडांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण, न्यायालयाचा निकाल तासाभरात

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी झाली. जितेंद्र आव्हाडांच्या वतीने अॅड. प्रशांत कदम यांनी त्यांच्या अटकेवर युक्तिवाद केला. तसेच, आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद अॅड कदम यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने 1 तास निकाल राखून ठेवला आहे. जितेंद्र आव्हाड यांना ठाणे नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना ‘बेल की जेल’ याचा निकाल तासाभराने लागणार आहे. (court reserved verdict of ncp mla Jitendra Awad for one hour)

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी झाली. जितेंद्र आव्हाडांच्या वतीने अॅड. प्रशांत कदम यांनी त्यांच्या अटकेवर युक्तिवाद केला. तसेच, आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद अॅड कदम यांनी केला आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून कलम 7 हा वाढवू शकत नाही. कारण तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे, जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे त्यांनी म्हंटले.

दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील मी स्वतःहून चौकशी करता आलो होतो असे सांगत तपासाला मी पूर्ण सहकार्य केले असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. यावेळी ही अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही कदम यांनी केला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड अनिल नंदीगिरी कोर्टात पोलिसांची बाजू मांडत आहे.

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांना जेव्हा ताब्यात घेण्यात आले त्यानंतर आय पी सी 141, 143, 146, 149, 323, 504, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(3), 135 हे कलम लावण्यात आले होते. त्यानंतर कलम 7 वाढवून त्यांना तसेच त्यांच्या सोबत 11 जणांना अटक करण्यात आली.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरूनच ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव जाणवतोय; जयराम रमेश यांचा टोला