Covaxin + Covishield : कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोस परिणामकारक; डॉक्टरांनी केलं ICMR च्या अभ्यासाचं स्वागत

DCGI grants regular market approval for Covishield, Covaxin for use in adult population
Covishield आणि Covaxin लस आता खुल्या बाजारात विकण्यास DCGI ची परवानगी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरने (ICMR) केलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोसच्या अभ्यासाचं मुंबईतील डॉक्टरांनी स्वागत केलं आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोस अधिक परिणामकारक आहेत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते. तसंच, मिक्स डोस घेतल्याने वेगळे प्रतिकूल परिणाम दिसून येत नसल्याचं डॉक्टर म्हणाले.

तथापि, चाचणी अद्याप प्रारंभिक टप्प्यात आहे, असा दावा तज्ञांनी केला आहे. शिवाय, जर दोन्ही लसी एकाच वेळी उपलब्ध असतील, तर लसीची उच्च कार्यक्षमता (९४ टक्के ते ९५ टक्के) लक्षात घेऊन, पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी समान लस वापरणं आवश्यक आहे. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या आपत्कालीन औषध विभागाचे प्रमुख डॉ. सुनील जैन म्हणाले की, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या मिश्रणाने लसीकरण केवळ सुरक्षितच नाही तर उत्तम रोगप्रतिकारक शक्ती देखील तयार होत असल्याचं दिसून येत आहे.

“लसींचे मिश्रण केल्याने विषाणूच्या नवनवीन व्हेरिएंट्स आणि म्युटेशन्सविरोधात लढण्यासाठी मदतगार होईल. ज्यांना आधीच कोव्हिशिल्डचा पहिला डोस मिळाला आहे त्यांना कोव्हॅक्सिन दिल्यानंतर न्यूट्रलाइझिंग अँटीबॉडीज सात पटीने वाढल्या,” असं डॉ. जैन म्हणाले. ते पुढे म्हणाले की लसींच्या मिश्रणाने सौम्य दुष्परिणामांची वारंवारता वाढू शकते. परंतु ही लक्षणे अल्पायुषी होती. “कोव्हिशिल्ड लसीसंदर्भात दुर्मिळ रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या अहवालांची चिंता आहे. मिक्सिंग आणि मॅचिंग सुरक्षा सुनिश्चित करताना लसीकरण पूर्ण करण्याची परवानगी देते. पुराव्यांवरुन हे मिश्र डोस चांगलं असल्याचं दिसून येत आहे,” असं डॉ. जैन म्हणाले.