घरमहाराष्ट्रCovid-19 : मुंबईत २३४ नवीन रुग्ण, शहरात एकाचा तर राज्यात चौघांचा मृत्यू

Covid-19 : मुंबईत २३४ नवीन रुग्ण, शहरात एकाचा तर राज्यात चौघांचा मृत्यू

Subscribe

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचे (Covid-19) रुग्ण कमी – अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनामुळे बुधवारी मुंबईत २३४ नवीन रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, संपूर्ण राज्यात कोरोनाचे १ हजार १०० रुग्ण आढळले असून दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत मुंबईत कोरोनाबाधित मृतांची संख्या १९ हजार ७५५ वर पोहोचली आहे. तर, राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४८९ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एकीकडे रुग्ण संख्या वाढत असून दुसरीकडे अधूनमधून कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने शासकीय व पालिका आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे १ हजार १०० नवीन रुग्ण आढळले असून त्यामध्ये, मुंबईतील २३४ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा – तेंडुलकर पिता-पुत्रांचे उदाहरण देत निलेश राणेंची ठाकरेंवर टीका, म्हणाले…

- Advertisement -

राज्यात दिवसभरात १ हजार ११२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ८० लाख ३ हजार ८०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ६ हजार १०२ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत बुधवारी २३४ नवीन रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत मुंबईतील रुग्णांची संख्या ११ लाख ६१ हजार १३६ झाली आहे. तसेच, दिवसभरात ३१९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत ११ लाख ३९ हजार ७९० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १ हजार ५९२ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा – खारघरमधील मृत्यूप्रकरणी विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवा; पटोलेंची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -