Covid 19 Active Cases: राज्यात ‘या’ पाच जिल्ह्यात ७५ टक्के अँक्टिव्ह रुग्ण

राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एक अंकी रुग्णसंख्या

first case of omicron sub variant ba 4 detected in india how deadly this coronavirus strain
Omicron Sub Variant : भारतात आढळला BA.4 चा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा व्हेरिएंट?

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतही चढउतार पहायला मिळत होता. मात्र राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पुणे, मुंबई,अहमदनगर,ठाणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ७५ टक्के कोरोना अँक्टिव्ह रुग्ण असल्याचे राज्य आरोग्य विभागाने म्हटले आहे. यात पाच जिल्ह्यात आणखी काही जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. रायगड,सोलापूर,सांगली,नाशिक आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात १५ टक्के कोरोनाचे अक्टिव्ह रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढती संख्या आणि अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. म्हणजेच राज्यातील जवळपास १० जिल्ह्यांमध्ये ९० टक्के अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत, असे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी प्रदिप आवटे यांनी म्हटले आहे.

राज्यात सध्या एकूण ३३ हजार ६३७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर २४ हजार ६८२ रुग्णांवर सध्या रुग्णालयात किंवा घरीच उपचार सुरू आहेत. ज्यात पुणे, अहमदनगर, ठाणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर रायगड, सोलापूर, नाशिक आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात सध्या ४ हजार ९५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण १६ जिल्ह्यांमधील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एक अंकी रुग्णसंख्या पहायला मिळत आहे. नंदूरबार जिल्ह्यात सध्या १ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. गोंदीया जिल्ह्यात १, भंडारा जिल्ह्यात २ , धुणे जिल्ह्यात ३, नांदेड, वाशिम, वरधा जिल्ह्यात प्रत्येकी ८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर यवतमाळमध्ये ९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा – LPG Cylinder Price: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर ५५ रुपयांनी महागला