Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE कोरोनाची तिसरी थोपवण्यासाठी आशा सेविकांनी आपले काम सातत्याने सुरु ठेवा- मुख्यमंत्री

कोरोनाची तिसरी थोपवण्यासाठी आशा सेविकांनी आपले काम सातत्याने सुरु ठेवा- मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी आशासेविका व अंगवाडी सेविकांचे कौतुक केले.

Related Story

- Advertisement -

राज्यात तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकाराकडून प्रयत्न केले जात आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील अंगणवाडी सेविका, आणि आशासेविकांबरोबर ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाची तिसरी थोपवण्यासाठी आशासेविकांनी काम आपले काम सातत्याने सुरु ठेवा असा सुचनाही मुख्यमंत्री यावेळी केल्या. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या टास्कफोर्समधील डॉक्टरांचाही सहभागी झाले होते.

”आरोग्य सेविकांवरचं ओझ कमी झालेलं नाही. आपलं काम हे सातत्याने चालू ठेवायचे आहे. कोरोना सदृश्य असलेले रुग्ण आणि आता पावसाळ्यामध्ये कोव्हिड आणि नॉन कोव्हिड हे ओळखणे थोडं अवघड होणार आहे. या पावसाळी साथीत आपल्याला काम करायचे आहे. आपल्या समोर येण्याआधी मुंबईसह आसपासचा परिसर आणि सिंधुदुर्गापर्यंत प्रशासनाची बौठक घेतली याचे कारण मुंबईसह या कोकण पट्ट्यात येत्या दोन दिवसांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अशी आव्हाने आपल्या समोर येत राहणारचं आहेत. या आव्हानांना तुम्ही सगळ्या लढवय्या, वीरंगणा, मर्दासारख्या लढणाऱ्या आहात. त्यामुळे अशा आव्हानांना न डगमगता कोरोनाचे संकट थोपवायचे आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आशासेविका व अंगवाडी सेविकांचे कौतुक केले.

- Advertisement -

तिसरी लाट न येऊ देण्यासाठी डॉक्टरांनी विनंती करत मुख्यमंत्री म्हणाले की, आशा आणि अंगणवाडी आपल्या प्रशासनाचा पाठकणा आहे. मी त्यांना बरं वाटाव किंवा त्यांच्याकडून काम करुन घ्याव म्हणून मी बोलत नाही, मी कौतुक केलं नसतं तरी त्या काम करत राहिल्या असत्या. त्या कर्तव्य म्हणून ते काम करतायंत. अनेक आशा सेविकांच्या व्यथा मला माहिती आहेत .पण ते आता बोलण्याची गरज नाही. स्वत:च कुटुंब, स्वत:ची तब्येत याच्याकडे लक्ष न देता त्या महाराष्ट्राची सेवा करतायंत. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मानाचा मुजरा केला.

आपण आहात, आपल्या आशेवरतीच हे प्रशासन आहे. म्हणून आजपर्यंत करत असलेल्या तुमच्या कर्तव्यबद्दल आणि पुढे अपेक्षित असलेल्या कर्तव्यबद्दल आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद आणि शुभेच्छा दिल्या.


Covishield vs Covaxin: कोविशिल्ड लसीमध्ये सर्वाधिक अँटीबॉडी, भारतातील संशोधनातून बाब उघड

- Advertisement -

 

- Advertisement -