घरताज्या घडामोडीCovid-19 लसीच्या 'Mixing & Matching' साठी केंद्राची शिफारस नाहीच

Covid-19 लसीच्या ‘Mixing & Matching’ साठी केंद्राची शिफारस नाहीच

Subscribe

कोरोनाविरोधी लसीकरणाच्या मोहिमेत सध्या लसींचा मिश्र पद्धतीने वापर (Mixing of vaccine) करण्यासाठी कोणतीही शिफारस केली नसल्याचे केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे. कोरोनाविरोधी लसी गेल्या काही महिन्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत. पण या लसींचा मिक्सिंग एण्ड मॅचिंगचा परिणाम हा वेगवेगळ्या लसींच्या अनुषंगाने वेगवेगळा राहिलेला आहे. म्हणूनच सध्याच्या घडीला लसींचे मिक्सिंग करण्याबाबत कोणतीही शिफारस केंद्र सरकारकडून करण्यात आली नसल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत मांडलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.

कोविड लसीच्या मिक्सिंग एण्ड मॅचिंगचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. तसेच या पद्धतीबाबतच्या वेगवेगळ्या लसींच्या निमित्ताने होणार अभ्यासही वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, असे लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. लसींच्या मिक्सिंग एण्ड मॅचिंगबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भारती पवार यांनी स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत लसींच्या मिक्सिंग एण्ड मॅचिंगबाबत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या मिक्सिंगच्या निमित्ताने नॅशनल टेक्निकल एडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन एडमिनिस्ट्रेशन फॉर Covid-19 यांनाही कोणतीही शिफारस केंद्राने केलेली नाही.

- Advertisement -

मिक्सिंग एण्ड मॅचिंगबाबत आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणतेही विशिष्ट अशी मार्गदर्शके जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या लसीच्या डोसच्या निमित्ताने लसींचे मिक्सिंग एण्ड मॅचिंग शक्य आहे का याबाबतच्या प्रश्नावर केंद्राने हे उत्तर दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकांचाही त्यांनी आधार घेतला नाही. आतापर्यंत कोणताही अभ्यास न झाल्याने तसेच वैज्ञानिक पुरावा नसल्यानेच या पद्धतीला केंद्राकडून मान्यता दिली गेली नसल्याचे लेखी उत्तरात स्रष्ट करण्यात आले आहे.

 

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -