Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Covid-19: लठ्ठ मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक, डॉक्टर देतायत 'हा' सल्ला

Covid-19: लठ्ठ मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक, डॉक्टर देतायत ‘हा’ सल्ला

९० ते ९५ टक्के मुलांना सौम्य स्वरूपाच्या संसर्गाचा धोका

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. कोरोनाच्या तिसऱ्या लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगितले जातेय. त्यामुळे कोरोना काळात लहान मुलांची अधिक काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातोयं. विशेषत: लहानपणापासूनच लठ्ठ असणाऱ्या मुलांची सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण लठ्ठ मुलांना कोरोना संसर्गाचा अधिक आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेताना त्यांचे वजन प्रमाणाबाहेर वाढू नये याकडेही लक्ष देण्याचा विशेष सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लठ्ठ मुलांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे शक्यता लक्षात घेता आशा सेविकांनी आपापल्या भागामध्ये अशा मुलांकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची काही लक्षणे आढळून आली तर त्याची माहिती तातडीने बालआरोग्य विभागाकडे द्यावी, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

लहान मुलांमध्ये काही लक्षणे आढळल्यास आशासेविकांना माहिती द्या 

प्रत्येकआशासेविकांकडे लहान मुलांमधील कोरोना संसर्ग कसा ओळखावा किंवा कशी काळजी घ्यावी यासाठी विशिष्ट प्रकारचा माहिती तक्ता दिला आहे. या तक्त्यामध्ये लहान मुलांची नाडीचे ठोके, श्वासाचा वेग, लघवीचे प्रमाण, शरीरातील ऑक्सिजन पातळी, शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे तपासावे याचे निकष दिले आहे. हा तक्ता भरून संबंधित विभागाच्या बाल आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे द्यावा लागतो. तसेच हा तक्ता भरताना एखाद्या कुटुंबास अडचण आल्यास अशावेळी आशासेविका मदत करत आहेत. असेही स्पष्ट केले. कोरोनाव्यतिरिक्त गावांमध्ये इतर कोणत्या प्रकारच्या आजाराची साथ किंवा आजाराच्या संदर्भात मुले तसेच प्रौढांमध्ये वेगळी लक्षणे दिसत असतील तर त्याचीही माहिती द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

९० ते ९५ टक्के मुलांना सौम्य स्वरूपाच्या संसर्गाचा धोका

- Advertisement -

ज्या मुलांना रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकारशक्तीचा आजार तसेच फुफ्फुसाचा आजार, किडनीचा त्रास, यकृतामध्ये बिघाड, लठ्ठपणासारखे आजार असल्यास त्यांना कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती अधिक गुंतागुतीची होऊ शकते असे मत डॉ. विजय येवले यांनी व्यक्त केले. परंतु ९० ते ९५ टक्के मुलांना सौम्य स्वरूपाचा संसर्ग होईल. या संसर्गावर घरीही वैद्यकीय उपचार देता येतील. त्यामुळे सौम्य स्वरूपाच्या आजारासाठी वैद्यकीय उपचार देताना या मुलांना १४ दिवस घरातून बाहेर पडण्यापासून पालकांनी रोखावे. तसेच संसर्गाचा धोका लक्षात घेता वयस्कर व्यक्तींपासून त्यांना दूर ठेवावे.

लहान मुलांना मास्क वापरणे अनिवार्य 

तसेच तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकेल असे योग्य प्रकारच्या कापडी धुतलेल्या मास्कचा वापर करावा, तसेच मुलांना मास्कच्या बाहेरील बाजूस हात लावायला देऊ नये, तान्ह्या बाळाचे स्तनपान बंद करू नये. पाच वर्षांवरील मुलांना कोमट पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगावे, अशा सूचनाही डॉक्टरांनी केल्या आहेत.


- Advertisement -

मुंबईकरांनो सावधान! हत्या, बलात्कार, घरफोडीच्या घटनांमध्ये झाली वाढ


 

- Advertisement -