Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Lockdown 2021: १ मे नंतर कडक निर्बंधांचा कालावधी वाढणार? महापालिका आयुक्तांचा...

Maharashtra Lockdown 2021: १ मे नंतर कडक निर्बंधांचा कालावधी वाढणार? महापालिका आयुक्तांचा मोठा खुलासा

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळेच राज्य सरकारने २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ मेच्या सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला. पण आता १ मेनंतर राज्य सरकार कोरोना संदर्भात कडक निर्बंध कमी करणार नाही, असा मोठा खुलासा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी केला आहे. सीएनबीसी टीव्ही-१८शी बोलताना ते म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्रातील निर्बंध सामान्य आहेत आणि राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोज राज्यात सुमारे ६० हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील परिस्थिती सुधारल्यानंतरच राज्य सरकार निर्बंध कमी करण्याचा विचार करेल. तसेच मुंबईचा मृत्यूदर जगातील सर्वात कमी दरामधील आहे.’

पुढे ते म्हणाले की, ‘१० फेब्रुवारापासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून याला ७६ दिवस उलटले आहेत. या ७६ दिवसांमध्ये ३.०९ लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. पण मला हे सांगताना आनंद होत आहे की, या ३.०९ लाख नव्या कोरोनाबाधितांमध्ये १ हजार ३१९ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच ३.०९ लाख कोरोनाबाधितांच्या एवढा मोठ्या संख्येत मृत्यूदर ०.४ टक्के एवढा आहे.’

- Advertisement -

रेमडेसिवीरच्या कमतरतेबाबत चहल म्हणाले की, ‘४० बीएमसी रुग्णालयात आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अँटीव्हायरल औषधांची कमतरता नाही आहे. ५ एप्रिलला वर्क ऑर्डर जाहीर केल्यानंतर आम्हाला आतापर्यंत ४५ हजार रेमडेसिवीर मिळाले आहेत. दिवसाला ३ हजार २०० रेमडेसिवीरचा वापर केला जातो. Mylan company  अखंडितपणे पुरवठा करत आहे आणि म्हणूनच मुंबईतील एकाही रुग्णाला रेमडेसिवीर अभावामुळे त्रास होत नाही.’

राज्यात काल (रविवार) ६६ हजार १९१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४२ लाख ९५ हजार २७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६४ हजार ७६० जणांच्या मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. तसेच अजूनही ६ लाख ९८ हजार ३५४ रुग्ण राज्यात सक्रीय आहेत.

- Advertisement -

तसेच काल मुंबईत ५ हजार ५४२ नव्या कोरोनाबाधित आढळले असून ६४ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर ८ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २७ हजार ६५१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ३७ हजार ७११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८६ टक्के इतका आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: लस घ्या अन् म्हणा #Vaccinated, सेल्फी झोनसाठी BMC चा पुढाकार


 

- Advertisement -