Covid19: फेरीवाल्यांसाठी ६१ कोटींची मदत

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर

Rs 61 crore help for peddlers during covid19 pandemic
Covid19: फेरीवाल्यांसाठी ६१ कोटींची मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पदपथावर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने ६१ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यात लॉकडाऊनची घोषणा करताना अधिकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाल्यांना ही मदत देण्यात येत आहे.

राज्यातील बांधकाम मजुरांनाही सरकारने आर्थिक मदत दिली आहे. राज्य सरकारकडे नोंद असलेल्या ९ लाखांहून अधिक बांधकाम मजुरांना राज्य सरकारने १३७ कोटी ३१ लाखांहून अधिक निधी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने घरेलू कामगारांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. घरकाम करणा-या कामगारांसाठी १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात घरकाम करणाऱ्या कामगारांना तसेच आर्थिक दुर्बल घटकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.


हेही वाचा – ‘त्या’ कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला – नवाब मलिक