Live Update: ‘भारत माता की जय’ घोषणेमुळे ममता दीदींना राग का येतो- मोदी

Maharashtra Breaking News

‘भारत माता की जय’ घोषणेमुळे ममता दीदींना राग का येतो- मोदी


धौली नदीवरील महापुरामुळे हरिद्वारपर्यंत धोका वाढला


महाराष्ट्रात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झालयं- गृहमंत्री अमित शाह


आमच्या पक्षात राणेंवर अन्याय होणार नाही- गृहमंत्री अमित शाह


सिंधुदुर्गात आम्ही मेडिकल कॉलेज तयार केलं आणि सुरू करण्याचा जेव्हा विचार केला. तेव्हा रुग्णालयाचं उद्घाटन अमित शाहांच्या हस्ते करावं, असं डॉक्टर आणि कार्यकर्त्यांनी सुचवलं त्यामुळे आम्ही शाहांना विशेष बोलावले.


केंद्रीय मंत्री अमित शाह सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी आगमन


चमोलीमध्ये हिमकडा दुर्घटनेत १०० ते १५० लोक दगावल्याची भीती


नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेज उद्धाटनासाठी दिग्गज नेत्यांची हजेरी 


उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धावली नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात alret जारी करण्यात आला आहे.


अंधेरीच्या डोंगरी परिसरात एनसीबीने तीन ठिकाणी छापे मारले आहेत.


मुंबईत काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन


केंद्रीय गृमंत्री अमित शहा आज सिंधुदूर्गात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदूर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार नारायण राणेंच्या एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे उद्धाटन करण्यासाठी आज दुपारी २ वाजता भाजपच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.


Petrol Diesel Price: जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर ‘जैसे थे’च ठेवले. पेट्रोल आणि डिझेल दरात देशांतर्गत बाजारात आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या बदलत्या दरांमुळे सामान्य माणसांच्या जीवनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची वाढती किंमत सर्वसामान्यांचा चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल मार्केट सातत्याने वर जात असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होतो. मात्र, आज देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.


उद्योजक अदानींच्या भेटीनंतर शरद पवारांनी निर्णय बदलला

अदानी कंपीनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला आले आणि लॉकडाऊनमध्ये बील माफीच्या मनस्थितीत असलेल्या महाविकास आघाडीने आपला निर्णय बदलला असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. अनेक राज्यांनी लॉकडाऊन दरम्यान वीज बील माफीच्या घेतलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रातही बील माफीचा फायदा राज्यातील ग्राहकांना देण्याचा विचार महाविकास आघाडी सरकारचा होता. मंत्रिमंडळ बैठकीतही तशी मानसिकता सगळ्याच मंत्र्यांची होती. पण अखेरपर्यंत बील माफी मिळालीच नाही. कारण त्याआधी ज्या अदानी समूहाकडून महाराष्ट्र वीज विकत घेतो त्या समूहाचे प्रमुख गौतम अदानींनी पवारांची भेट घेतली आणि चक्रे फिरली. राज्यातील साडेबारा कोटी जनतेला वीज बील माफीला मुकावे लागल्याचा आरोपही राज यांनी केला.

टँकरने दुचाकीला धडक दिल्याने वडिलांचा मृत्यू; मुलगा जखमी

टँकरने दुचाकीला धडक दिल्याने पित्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी- गोरठा रस्त्यावर शनिवारी रात्री ही घटना घडली असून या अपघातात ४५ वर्षीय सुभाष भीमा नाईक यांचा मृत्यू झालाय तर त्यांचा मुलगा सुजित गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


शेतकरी आंदोलन गांधी जयंतीपर्यंत सुरूच राहणार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 73 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे मोदी सरकारपुढच्या अडचणीत अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.


राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जायला लावू नये

राज्यपाल हे घटनात्मक राज्याचे प्रमुख आहेत, ते सध्या केंद्र सरकारचे सूत्रधार म्हणून काम करतायत की राज्य सरकारच्या संयमाचा कडेलोट पाहताय, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत ‘राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जायला लावू नये,’ असा इशारा दिला. ते शनिवारी नाशिक येथे बोलत होते. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ उमेदवारांच्या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मान्यता न दिल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे.