घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात मागील २४ तासामध्ये ११ हजार १४१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Live Update: राज्यात मागील २४ तासामध्ये ११ हजार १४१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Subscribe

राज्यात मागील २४ तासामध्ये ११ हजार १४१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत एकूण ५२ हजार ४७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ९७,९८३ हजाराच्या घरात पोहोचले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्याने राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा


औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन

- Advertisement -

औरंगाबादमध्ये वाढत्या कोरोनामुळे ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाविद्यालये बंद मात्र ऑनलाईन शिकवणी सुरु राहिल, दुकाने, बाजारपेठा, मॉल, कार्यालये, आठवडी बाजार बंद असणार तसेच इतर अस्थापना बंद असतील. बँक चालु असणार आहे. शनिवार आणि रविरा पुर्ण लॉकडाऊन असणार आहे.


संजय कुमार यांनी घेतली राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ

- Advertisement -

संजय कुमार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून घेतली राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली.


मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा गुन्हा एटीएस कार्यालयात दाखल

आज दिनांक ७ मार्च २०२१ रोजी गु. र. क्र. १२/२०२१ भा द वि कलम ३०२,२०१,३४,१२० B प्रमाणे मयत यांच्या पत्नी श्रीमती विमला मनसुख हिरन यांचे फिर्यादीवरून द वि प पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हत्या, पुरावा नष्ट करणे, कट रचणे सह या अनुषंगाने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


ममता दींदीनी विश्वास तोडला – मोदी


अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश. कोलकात्यात भाजपच्या रॅली दरम्यान मुकुल राय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.


राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


नाशिकमध्ये होणार संमेलन स्थगित

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ९४वे साहित्य संमेलन २६, २७, २८ मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.


तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटना संपावर ठाम

तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेच्या निवेदनाची महसूल विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. अधिवेशन संपताच बैठक न घेतल्यास २२ मार्च पासून बेमुदत संप करणार असल्याचा इशारा तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेने दिला आहे. यासंदर्भातील पत्र शासनाला दिले असून प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु, दीड महिना उलटून गेल्यावरही संघटनेच्या निवेदनाची दखल न घेता महसूल विभागाने वेळ काढू पणा केल्याचा असल्याचा आरोप तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेकडून केला जात आहे. त्यामुळे तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेने महसूल विभागावर नाराजीचा सूर आवळला आहे. दरम्यान शासनाने तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबतचे निर्णय लवकरात लवकरात द्यावा, अशी मागणी यावेळी तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेच्यावतीने करण्यात आली.


साहित्य संमेलनाबाबत आज महत्वाची बैठक

साहित्य संमेलनाबाबत आज महत्वाची बैठक होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पहाता साहित्य संमेलन घ्यावे की न घ्यावे याबाबत निर्णय होणार आहे.


ममता-मोदी आज आमने-सामने!

विधानसभा निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा पारा चढू लागला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या यांच्यात थेट लढत बघायला मिळत असून, दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बंगालमध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकणार असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे आज ममता विरुद्ध मोदी असा शाब्दिक युद्ध बघायला मिळणार आहे.


३१ मार्चपूर्वी पॅन आधारशी लिंक करा अन्यथा पॅन होईल रद्द

येत्या ३१ मार्चपर्यंत जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड १ एप्रिल २०२१ पासून Inactive होणार. तसेच डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, पॅन कार्ड धारकांना विना पॅन कार्डधारक मानले जाईल.


मनसुख हिरेन यांच्या नखाचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविणार

मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर, आता त्यांच्या नखाचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्या केमिकल अॅनॅलिसीसच्या रिपोर्टनंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे.


मुंब्रा बायपास मार्ग आज वाहतुकीसाठी बंद

मुंब्रा बायपास मार्ग आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान सुरु असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या मुंब्रा खाडीपुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम आज हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.


मुंबईत आज लसीकरण राहणार बंद

आज मुंबईतल्या लसीकरण केंद्रात कोरोना लसीकरण होणार नाही. पुढील सूचना येईपर्यंत मुंबईत दर रविवारी लसीकरण बंद असणार आहे.


वाझे-हिरेन यांचा सीडीआर रिपोर्ट बाहेर आलाच कसा?

रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पेडररोड इथल्या ‘अ‍ॅन्टिलिया’समोर संशयास्पदरित्या सापडलेल्या स्फोटक वाहनाचे प्रकरण आता कमालीचे संशयात गुरफटले आहे. गुप्तवार्ता विभागाचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर भाजप नेत्यांचा रोख आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना यातील अनेक दुवे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचत असल्याची बाब समोर आली आहे. (सविस्तर वाचा)


नागपुरात कोरोनाचा धोका वाढतोय

नागपूर जिल्ह्यात ११८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २४ तासांत ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


पुणे महापालिका कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु

पुणे महापालिका कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दळवी रुग्णालय आणि रक्षक नगर स्टेडीयम येथील कोवीड केअर सेंटर सुरू केले जाणार असून येत्या मंगळवारपासून हे दोन्ही केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे.


औरंगाबादमध्ये २४ तासांत ४४० कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ४४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३८६ जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -